आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिटीबस सेवा सुधारण्यासाठी आयुक्त सरसावले, जानेवारीपर्यंत अंतिम मान्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शहरातील परिवहन व्यवस्था सक्षम करण्यासाठी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी पुढाकार घेतला आहे. अर्बन मास्क ट्रायजेस्ट कंपनीमार्फत परिवहनचा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. कंपनीचे अधिकारी श्रीपाद वाईकर यांनी शनिवारी महापालिका अधिकार्‍यांची भेट घेतली. ऑगस्ट महिन्याच्या सभेपुढे सदरचा विषय चर्चेसाठी येणार असून, त्यानंतर त्या कंपनीस वर्क ऑर्डर देण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त गुडेवार यांनी दिली. जेएनयूआरएम योजनेत सोलापूर परिवहन सेवेचा समावेश करण्यासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे.

शहराची लोकसंख्या पाहता बसची संख्या, कोणत्या मार्गावर किती बस लागतील त्याचा अभ्यास, शहरातील वाहतुकीनुसार बसची संख्या आदी बाबींचा समावेश आराखड्यात असणार आहे. एक बस चुकली तर त्या मार्गावरील पुढील बस किती वाजता येणार, याची माहिती प्रवाशांना स्थानकावर मिळणार आहे. पुढील 25 वर्षाची गरज ओळखून आखणी करण्यात येणार आहे. त्याबाबत माहिती कंपनीचे अधिकारी वाईकर यांनी दिली.

परिवहन विभागाच्या वतीने प्रस्ताव तयार करून ऑगस्टच्या पालिका सभागृहात मंजुरीसाठी जाईल. त्यानंतर आराखडा तयार करण्याचे काम सुरू होईल. 20 सप्टेंबरपर्यंत आराखडा होईल. त्यानंतर राज्याकडे जाईल. तेथून ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान केंद्राकडे जाईल आणि मार्चअखेर मंजुरी मिळून प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल.

अर्बन मास्क ट्रायजेस्ट कंपनीचे अधिकारी श्रीपाद वाईकर हे सोलापूरचेच आहेत. त्यांनी देशातील बहुतेक शहरातील जेएनयूआरएम योजनेचा आराखडा तयार करून केंद्राकडे सादर केला. त्यास मंजुरीही मिळाली. वडिलांच्या आग्रहामुळे शहरासाठी काहीतरी करायचे म्हणून त्यांनी यापूर्वी महापालिकेत सहावेळा येऊन अधिकार्‍यांच्या भेटी घेऊन संकल्पना मांडली होती. पण त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. श्री. गुडेवार यांनी प्रतिसाद दिला.