आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिटीबसचा प्रवास 23 टक्के महागला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शहराची जीवनवाहिनी असलेली परिवहन सेवा सुधारण्याऐवजी महापालिकेने शुक्रवारी तिकीट दरवाढ करण्याचा मार्ग अवलंबला. महापालिकेच्या परिवहन विभागातील सिटीबसच्या तिकीट दरात तब्बल 23 टक्के वाढ करण्यात आली आहे. नवीन दराची अंमलबजावणी शनिवारपासून करण्यात येणार आहे. या दरवाढीस जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी अंतिम मंजुरी दिल्याची माहिती परिवहन व्यवस्थापक ए. ए. पठाण यांनी दिली. सोयीसुविधा न देता तिकीट दरवाढ केल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ झाल्याचे सांगून सिटीबस तिकीट दरवाढ करण्याचा प्रस्ताव परिवहन समितीने पालिका सभागृहापुढे ठेवला होता. त्यास सभागृहाने मान्यता दिली होती. जिल्हाधिकारी र्शी. गेडाम यांनी अंतिम मान्यता दिली. या दरवाढीमुळे किमान तिकिटासाठी पाच रुपयांऐवजी सहा रुपये मोजावे लागणार आहेत, तर कमाल तिकीट 27 ऐवजी 36 रुपये मोजावे लागणार आहे.