आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरअभियंता पदाचा गैरवापर प्रकरण: निलंबन कारवाईवर सावस्कर कोर्टात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- पदाचा गैरवापर व प्रशासकीय कामातील त्रुटींना जबाबदार धरून निलंबित करण्यात आलेल्या नगरअभियंता सुभाष सावस्कर यांनी महापालिकेविरुद्ध मुंबई उच्च्च न्यायालयात दाद मागितली आहे. आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी कारवाई करताना 28 प्रकरणांत सावस्कर यांच्यावर ठपका ठेवला आहे. मंगळवारी सायंकाळी 4.30 वाजता मुंबई न्यायालयात सुनावणी होणार आहे.

नगर अभियंता सावस्कर यांना जीआयएस, राजेशकुमार मीनानगर, शहरातील अतिक्रमणासह विविध प्रकारच्या 28 कारणांमुळे निलंबित करण्यात आले आहे. त्याविरोधात सावस्कर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली; पण त्यापूर्वी महापालिकेने उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केला होता. त्यामुळे सोमवारी महापालिकेचे वकील विजय किल्लेदार यांना नोटीस मिळाली. ते तत्काळ न्यायालयात हजर झाले होते. महापालिका मंगळवारी आपले म्हणणे मांडेल अशी माहिती मनपा सूत्रांनी दिली.