आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘परिवहन’ची दशा आणि दिशा - चार लाख रुपयांचे उत्पन्न वाढणार 13 लाखांपर्यंत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिका परिवहन विभागाला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी परिवहनने नियोजनाचा अहवाल राज्य शासनाकडे पाठवला आहे.

या नियोजनानुसार फेब्रुवारी 2015 पर्यंत केंद्र सरकारच्या जेएनयूआरएम योजनेअंतर्गत 200 बस सोलापूर महापालिका परिवहनच्या ताफ्यात येणार आहेत. परिवहनला असलेले 40 कोटी रुपयांचे कर्ज आणि आगामी काळातील 29 कोटींचा संभाव्य धोका लक्षात घेऊन हे नियोजन केले आहे. नियोजनाची अंमलबजावणी होण्यासाठी मात्र राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. नियोजन प्रत्यक्षात आले तर दैनंदिन उत्पन्न 3.8 लाखावरून 13.2 लाखांपर्यंत वाढू शकेल.

रोज 88 हजारांचा नफा होऊ शकेल : परिवहन विभागाने तयार केलेल्या अहवालानुसार बंद असलेल्या मार्गांवर 55 गाड्या सुरू केल्यास रोज 4.72 लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल. त्यातून खर्च 3.84 लाख वजा जाता परिवहनला 88 हजार 203 रुपये उत्पन्न वाढेल.

व्हॉल्वो बस मार्गावर धावू नये म्हणून काहीजण जाणीवपूर्वक प्रयत्न करत असल्याचे याआधीच निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर वाहतुकीचे नियोजन आवश्यक आहे. आता 39 मार्गांवर 72 बस धावत आहेत. या मार्गांवर आणखी 55 बस वाढवणे आवश्यक आहे. बंद पडलेले 30 मार्ग पुन्हा चालू केल्यास उत्पन्न वाढेल. शालेय विद्यार्थ्यांसाठी 15 बस सुरू करण्याचे नियोजन असून, त्याची अंमलबजावणी व्हावी.

शहरापासून 40 किलोमीटर परिघापर्यंत प्रवासाची मान्यता मिळाल्यास रोजचा नफा 1.92 लाख इतका होऊ शकेल. तसे झाल्यास दैनंदिन उत्पन्न 8.02 लाख तर 6.09 लाख खर्च होणार आहे.