आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॉपी केल्यास फौजदारी, जिल्हाधिकारी डॉ.गेडाम यांचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - कॉपी करणे हा गुन्हा आहे. तसा कोणी प्रयत्न केल्यास थेट फौजदारी करू, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी सोमवारी दिला. शहर व जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी यंत्रणा सज्ज केल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. गुणवत्ता वाढीसाठी संस्थाचालक, शिक्षक आणि स्टाफ जर कॉपीच्या प्रकरणात आढळला तर संबंधित शाळांच्या मान्यता रद्द करण्याचे सूतोवाचही त्यांनी केले.बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे, तर दहावीची परीक्षा मार्चच्या पहिल्या
आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. त्याच्या नियोजन व तयारीविषयी त्यांनी माहिती दिली.

खरा निकाल बाहेर येण्यासाठी उस्मानाबाद आणि नांदेडमध्ये कॉपीमुक्त परीक्षा घेण्याची यंत्रणा राबवली. त्यामुळे निकालाचे प्रमाण घटले तरी नंतरच्या काळात तो वाढला. म्हणजेच मुले अभ्यास करू लागली. त्यामुळे पालकांनी समाधानच व्यक्त केले. तोच पॅटर्न सोलापुरात राबवणार असल्याचे डॉ. गेडाम यांनी स्पष्ट केले. त्यांच्या समवेत जिल्हा पोलिसप्रमुख राजेश प्रधान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार आणि शिक्षण खात्यातील अधिकारी उपस्थित होते. डॉ. गेडाम म्हणाले, ‘‘1982 मध्ये कॉपीविरोधी कायदा झाला. कॉपी करणे म्हणजे गुन्हाच ठरवला गेला. त्याचे पालन होत नसल्याने गांभीर्य गेले. परीक्षा केंद्रांवर बहुतांश विद्यार्थी मोठय़ा चतुराईने कॉप्या नेतात. पकडले गेले तरी जुजबी कारवाई होते. परंतु आता चालणार नाही. मुलांनी अभ्यास केलाच पाहिजे, खरा निकालही दिला पाहिजे.’’

मी स्वत: फिरणार आहे
परीक्षा काळात कुठेही गैरप्रकार होणार नाहीत, याची काळजी घेण्यासाठी पथके असतीलच. शिवाय मी स्वत: फिरणार आहे. कोण कुठे काय करत आहे, यावर माझे बारीक लक्ष राहील.’’ डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी
कारवाई तर होणारच..
खरे पाहता, कॉपी करू नका, असे बोलण्याची वेळही येता कामा नये. दुर्दैवाने तसे काही घडत असेल तर कारवाई करावीच लागेल. शेवटी चांगले शिक्षण घेऊनच या मुलांना आमच्या राजेश प्रधान, जिल्हा पोलिसप्रमुख

अशी राबविणार यंत्रणा, अशा आहेत सूचना

सुमारे 400 केंद्र संचालकांकडे जबाबदारी
महसूल, महापालिका आणि झेडपीचे बैठे पथक
शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांचे भरारी
भरारी पथकाला मार्गदर्शनासाठी स्वतंत्र नियंत्रण
पथकाला कुठे जायचे आहे, ते त्याच दिवशी
परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात जमावबंदी
विद्यार्थ्याची पूर्ण तपासणीनंतरच आसनापर्यंत जाईल
विद्यार्थिनींची तपासणीसाठी स्वतंत्र कक्ष