सोलापूर - महापालिका प्रशासनाला शिस्त लावणारे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची बदली झाल्याचा परिणाम आता हळूहळू पाहण्यास मिळत आहे. अधिका-याच्या घरी लग्नकार्य असल्याने बुधवारी महापालिकेतील बहुतेक सारे अधिकारी अन् कर्मचारी कर्तव्य सोडून विवाह सोहळ्याला गेले. त्यामुळे दुपारपर्यंत महापालिकेतील अनेक विभाग अधिकारी आणि कर्मचा-यांअभावी ओस असल्याचे दिसून आले.
करसंकलन, मुख्य लेखपाल, साहाय्यक संचलन नगर रचना, बांधकाम परवानगी, शहर सुधारणा, भूमी मालमत्ता, जलनित्सारण आणि जलवितरण आदी विभागांमध्ये कर्मचा-यांची संख्या केवळ दहा ते पंधरा टक्के इतकीच होती. नगर अभियंता गंगाधर दुलंगे यांच्या मुलीचे बुधवारी लग्न होते, अशी माहिती ‘दिव्य मराठी’ला मिळाली.
- दुलंगे यांच्या मुलीच्या लग्नासाठी कोणीही अर्ध्या रजेचा अर्ज दिला नाही. दुपारपर्यंत कोण कोण कार्यालयात गैरहजर होते याची माहिती सीसी टीव्ही फुटेजमधून पाहता येईल. ते पाहून खुलासा नोटिसा देण्यात येईल. अमिता दगडे, सहाय्यक आयुक्त