आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामांसाठी नगरसेवकांचा ठिय्या

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - ड्रेनेजची कामे होत नसल्याने नगरसेवक अंबिका पाटील, नागेश वल्याळ यांनी सोमवारी सकाळी विभागीय कार्यालय क्रमांक दोनमध्ये ठिय्या मांडला. साहाय्यक आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी कर्मचारी देण्याचे मान्य केल्यानंतर दोन तासांनी आंदोलन संपले.

ड्रेनेज विभागात काम करणारे कर्मचारी नसल्याने प्रभाग क्रमांक पाच, सहा आणि सातमध्ये ड्रेनेज लाइन भरली आहे. त्यामुळे नागरी अडचणी निर्माण झाल्या. प्रभाग क्रमांक पाचमध्ये ड्रेनेज विभागात काम करणार्‍या कर्मचार्‍यांची बदली केल्याने नगरसेवक नागेश वल्याळ, अंबिका पाटील, राजकुमार पाटील, षडाक्षरी हिरेमठ यांनी झोन क्रमांक दोन गाठले. सकाळी 9.25 पर्यंत झोन कार्यालयात कोणी नसल्याने कुलूप होते. पाटील, वल्याळसह सुमारे 15 कार्यकर्त्यांनी ठिय्या केला. साहाय्यक आयुक्त डॉ. जावळे, विभागीय अधिकारी व्ही. व्ही. चंकेश्वरा यांनी नगरसेवकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दोन तासाच्या चर्चेनंतर नगरसेवकांनी माघार घेतली.

कामानिमित्त बाहेर
कर्मचार्‍यांच्या कामाचे नियोजन करण्यासाठी विभागातील परिसरात होतो. त्यामुळे कार्यालयात उपस्थित नव्हतो. सकाळी बहुतेक कर्मचारी कामावर हजर असल्याने कार्यालयात होते.’’ व्ही. व्ही. चंकेश्वरा, विभागीय अधिकारी, कार्यालय क्रमांक दोन