आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर महापालिकेचा मक्तेदारांच्या सोयीसाठी बजेट!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महापालिकेतील अनेक नगरसेवकांचे नातेवाईक मक्तेदार आहेत. त्यांना कामे देण्यासाठी आणि त्यांची सोय पाहून निधी पळवण्यासाठी 31 मार्चला अंदाजपत्रक सादर केले जाते की काय, अशी शंका माजी महापौर भीमराव जाधव गुरुजी यांनी ‘दिव्य मराठी’कडे व्यक्त केली.

ते म्हणाले, ‘जनकल्याणसाठी बजेट हवे. पदाधिकार्‍यांसाठी आम्ही निधी कधीच राखून ठेवला नाही. तो आता तसा ठेवण्यात येत असल्यामुळे टक्केवारीचा वास येतोय. निधीचे समान वाटप केल्यास पक्ष जिवंत राहतो. सर्वसामान्यांच्या मनात पक्षाबद्दल आदर भावना निर्माण होते. एकाने निधी नेला तर अन्य दहा नगरसेवक नाराज होतात याचे भान पाहिजे.’
नगरसेवकांच्या हातात वॉर्ड विकास निधीशिवाय काहीच नसते. समान निधी वाटप झाल्यास नगरसेवकांना विकासकामे हाती घेणे शक्य असते. पण तसे होत नाही. 31 मार्चर्ला बजेट आणून त्यावर चर्चा न करता घाईने मंजूर करण्यामागे प्रमुख पदाधिकार्‍यांचे हितसंबंध असल्याची चर्चा आता सत्ताधारी नगरसेवकांतही होत आहे.

काय म्हणतात नगरसेवक
काँग्रेस : दोन दिवस आधी बजेट घेतल्यास आम्हा महिलांना कळेल.’’ फिरदोस पटेल
बजेट 29 मार्चला घ्यावे, पण मुद्दय़ाला धरून कोणीच बोलत नाही.’’ विनायक कोंड्याल
दोन दिवस आधी घ्या. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत थांबावे लागणार नाही.’’ अश्विनी जाधव
आधी बजेट घेतल्यास नगरसेवकांना कळेल. बहुमताने मंजूर होत असले तरी चर्चा तरी होईल.’’ राजकुमार हंचाटे
मी यावर बोलणार नाही.’’ शिवलिंग कांबळे
31 माचर्ला रात्री 12 वाजेपर्यंत बजेट सादर करा. आधी घेतल्यास उत्तम.’’ निर्मला नल्ला
बजेट अगोदर घ्या, पण बजेटवरच चर्चा झाली पाहिजे. मुद्दय़ाला धरून कोणी बोलत नाही.’’ सुशीला आबुटे
भाजप : बजेट दोन दिवस आधी झाल्यास आम्हाला कळेल.’’ चंद्रकांत रमणशेट्टी
50 टक्के महिला आरक्षण आहे. महिलांच्या मागणीचा विचार सत्ताधार्‍यांनी करावा. दोन दिवस बजेट सभा घ्या.’’ अंबिका पाटील
महापालिकेचे बजेट आम्हालाही कळू द्या. लवकर बजेट घ्या.’’ कृष्णहरी दुस्सा
राष्ट्रवादी : आम्ही नवीन आहोत, आम्हाला कळावे, यासाठी बजेट लवकर घेण्याची मागणी पक्षाकडे करणार आहे.’’ शांता दुधाळ
मी नवीन आहे. त्यामुळे सविस्तर चर्चेसाठी दोन दिवस घ्यावे.’’ गीता मामड्याल
अपक्ष : अगोदर घेतल्यास उत्तम होईल. 31 मार्चपूर्वी घ्या.’’ दत्तू बंदपट्टे
माकप : बजेट पुस्तक उशिरा करतात. बजेट सभा अगोदर घेतली पाहिजे.’’ माशप्पा विटे,
शिवसेना : बजेट लवकर न घेण्याचे कारण कळत नाही. ते कारण स्पष्ट झाले तर बजेट कळेल.’’ भीमाशंकर म्हेत्रे


मी महापौर असताना मार्चच्या तिसर्‍या आठवड्यात बजेट सभा घेत होतो. सत्ताधारी नगरसेवकांशी चर्चा करून नागरी सुविधांसाठी निधी देण्यासंदर्भात अभ्यास करत होतो. बजेट सादर करण्यापूर्वी विरोधी पक्षाच्या विठ्ठल फलमारी, रामभाऊ गणाचार्य यांच्यासारख्या नगरसेवकांना विश्वासात घेऊन बजेट तयार करत होतो. त्यामुळे सभागृहात फारसा विरोध होत नव्हता आणि वेळेत सभा संपत असे.’’ भीमराव जाधव, माजी महापौर