आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंपनी-महापालिकेच्या वादाचा सोलापूर शहरात ‘कचरा’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - देय रकमेच्या वादावरून सफाई मक्तेदार कंपनी समीक्षा कंस्ट्रक्शनच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून कामबंद आदोलन सुरू केले आहे. देय रकमेविषयी कंपनी आणि महापालिका प्रशासन यांच्यात वाद आहे. त्यांच्या या वादामुळ‌े शहरात दुसऱ्यांचा कचरा साठलेला आहे.
सुमारे ३०० टन कचरा पडून आहे. कचरा उचलण्याचे नियोजन करण्यासाठी गुरुवारी दिवसभर अधिकारी महापालिकेत ठाण मांडून होते. सफाई होत नाही आणि कचरा जागेवर साचल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. याप्रश्नी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी गुरुवारी सायंकाळी तातडीची बैठक घेत पर्यायी यंत्रणा उभी केली. पदाधिकाऱ्यांव्यतिरिक्त इतर अधिकाऱ्यांच्या वाहनांवरील एक चालक कमी केले आहेत.

कामगारांनी दिला होता इशारा
थकीत वेतन एक जानेवारी रोजी नाही दिल्यास काम बंद करण्याचा इशारा कामगारांनी दिला होता. त्यानुसार त्यांनी काम बंद केले. मात्र, प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
आजपासून पालिका करणार नियोजन
^समीक्षा कंपनी कर्मचाऱ्यांनी कामबंद केले असून, त्यानंतर आम्ही पर्यायी यंत्रणा उभी करून कचरा उचलण्याचे काम सुरू केले आहे. शुक्रवारपासून सक्षमपणे मनपा कचरा उचलेल. आर.एम. तलवार, मनपासफाई अधीक्षक

मक्ता रद्द करा
^महापालिका सभागृहात ठराव केल्याप्रमाणे महापालिकेने समीक्षाचा मक्ता रद्द करावा. त्यांच्याकडून १.७८ कोटी येणे आहे. ते मनपाने वसूल करावे. सिध्देश्वर यात्रा काळात शहरात कचरा साचू नये यासाठी प्रशासनाने आताच नियोजन करावे.” जगदीशपाटील, नगरसेवक

आज वाहन चालक भरती
^कचरा उचलण्यासाठी शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता घंटागाडी चालक ६०, मोटार बिगारी १२०, जड वाहन चालक २० अशी २०० जागांची भरती करण्यात येणार आहे. आम्ही पर्यायी व्यवस्था उभी करत आहोत.” चंद्रकांत गुडेवार, आयुक्त

समीक्षा कर्मचाऱ्यांचे म्हणणे ...
शहरातील कचरा उचलण्याचे नियोजन नसल्याने अनेक भागात कचरा साचून आहे.
महापालिका आणि कचरा उचलणारी समीक्षा कंपनी यांच्यात देय रकमांबाबत वाद निर्माण झाला आहे.

महापालिकेकडून पाच कोटी ९१ लाख ८६ हजार ४६५ रुपये येणे बाकी आहे.
वाद निर्माण झाल्यास थकीत रकमांपोटी १० टक्के रक्कम ठेवून घेऊन अन्य रक्कम देणे अपेक्षित आहे.
डिसेंबर २०१३ ते ऑगस्ट २०१४ पर्यंत कोटी ७६ लाख ८६ हजार देय असून त्यापैकी कोटी ९५ लाख दिले आहेत.

कोटी ८१ लाख येणे आहे.
ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०१३ या दोन महिन्यांत २० लाख दंडाची रक्कम कापली.

महापालिकेचे म्हणणे...
समीक्षा कंपनीने उचललेल्या कचऱ्यानुसार चालू वर्षात कोटी २७ लाख देणे लागते. त्यांना कोटी २८ लाख दिले. त्यापैकी कोटी २१ लाख (वाहन भाडे, सेवाकर, इनकम टॅक्स, सुरक्षा जमा) इतर करापोटी कापले. तरीही त्यांना कोटी ७८ लाख जास्त गेले आहेत. तेच महापालिकेचे देणे लागतात. त्यांच्याकडून सांगितली जात असलेली माहिती चुकीची आहे.