आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • SOLAPUR Corporation Commissioner Chandrakant Gudewar Transfer

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

NEWS @ MH: उद्धव यांच्या वक्तव्याला गडकरींचा दुजोरा, महायुतीच ठरवेल मुख्यमंत्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज्यात भारतीय जनता पक्ष व शिवसेना सत्तेत आल्यास मुख्यमंत्री कोण होणार, हे महायुती निश्चित करणार आहे, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व ग्रामविकास मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याला दुजोरा दिला. चार महिन्यांनंतर होणार्‍या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला सत्ता मिळेल, असे अपेक्षित धरून मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री कोणाचा असेल, यामध्ये भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांच्यादरम्यान वाक्युद्ध रंगले आहे.
विधानसभेच्या मागील निवडणुकीत शिवसेनेने भाजपपेक्षा जास्त जागा लढवल्या. मात्र, शिवसेनेच्या तुलनेत भाजपच्या जास्त जागा आल्या होत्या. शिवाय लोकसभेत मिळालेल्या जागांच्या आधारे विधानसभेचे गणित निश्चित करण्याबाबत महायुतीत धुमश्चक्री सुरू आहे. विधानसभेत शिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळण्यासाठी भाजपने दबावाचे राजकारण चालवले आहे. जागा वाटपावरून सुरू झालेला वाद मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचल्यानंतर महायुतीतील नेत्यांनी सावध प्रतिक्रिया देणे सुरू केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारीच मुख्यमंत्री महायुती ठरवणार आहे, असे स्पष्ट केले होते. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याला दुजोरा देत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
पुढे वाचा, पुन्हा एकदा जैन विरुद्ध खडसे लढतीची शक्यता...
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष चांदूरकरांची उचलबांगडी?...