आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुक्त लागले कामाला; झोन कार्यालयांची आढावा मोहीम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शहरवासीयांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याबद्दल आणि कामे खोळंबून राहात असल्याबद्दल आमदार प्रणिती शिंदे यांनी बैठक घेऊन नाराजी व्यक्त केली. त्यानंतर महापालिका आयुक्त अजय सावरीकर यांनी झोन कार्यालयांना भेटी देऊन आढावा बैठक घेण्यास सुरुवात केली. शुक्रवारी झोन क्रमांक चार आणि सहाला भेट देऊन नगरसेवकांची बैठक घेतली. गटारी, दिवाबत्तीच्या तक्रारी होत्या. भांडवली आणि वॉर्ड विकास निधीतून कामे सूचवा, तत्काळ कामे सुरू करण्यात येतील अशी ग्वाही आयुक्त सावरीकर यांनी दिली.

8 ऑगस्टपासून आठ झोनची निमिर्ती करण्यात आली. त्या ठिकाणी पुरेसे मुनष्यबळ नसल्याने प्रभागातील कामे होत नसल्याची ओरड सुरू झाल्याने शुक्रवारी सकाळी आयुक्त सावरीकर, उपायुक्त अनिल विपत यांनी चार नंबर झोनला भेट दिली. झोन अधिकारी किशोर सातपुते यांच्याकडून माहिती घेतली. तीन कनिष्ठ अभियंता, सहा आरोग्य निरीक्षक, तीन निरीक्षक होते. बाबा मिस्त्नी, शिवानंद पाटील, अनिल पल्ली, कृष्णहरी दुस्सा, सुजाता आकेन, वेदमती ताकमोगे, विजया वड्डेपल्ली, र्शीकांचना यन्नम, परवीन इनामदार आदी नगरसेवक उपस्थित होते.
खुल्या गटारी, दिवाबत्तीची तक्रार - प्रभागातील खुल्या गटारी नियमितपणे साफ केल्या जात नाहीत. कचराही महापालिका कामगारांकडून रोजच्या रोज काढण्यात येत नाही. बहुतांश ठिकाणी दिवे नसल्याने रस्त्यावर अंधार असतो अशा तक्रारी बैठकीत नगरसेवकांनी केल्या. महापालिकेत ठरल्याप्रमाणे जेसीबी आणि रोडरोलर द्या, अशी मागणीही नगरसेवकांनी केली.
31 ऑगस्टपासून सुरू होणार घंटागाडी

मजूर दांड्या मारतात - झोन क्रमांक सहामधील मजूर कामावर येत नाहीत, दांड्या मारतात. त्यामुळे प्रभागातील कामे खोळंबतात अशी तक्रार नगरसेवकांनी केली. नुसत्या बैठका नको, कृती करा, असे नगरसेवक दिलीप कोल्हे यांनी या वेळी सुनावले. बैठकीस सुनीता कारंडे, लक्ष्मण जाधव, मनोज शेजवाल, सुनीता रोडे, सुशीला आबुटे आदी नगरसेवक उपस्थित होते.

नगरसेवकांना प्रत्येकी 12 लाख - नगरसेवकांना दिला जाणारा वॉर्ड विकास निधी 100 टक्के, तर भांडवली कामातून 50 टक्के निधी दिला जाणार आहे. त्यानुसार प्रत्येक नगरसेवकास प्रभागातील कामांसाठी 12 लाख रुपये मिळणार आहेत. परंतु यासाठी नगरसेवकांनी प्रभागातील कामांची सविस्तर यादी देणे आवश्यक आहे.

शहरात कचरा उचलण्याचा मक्ता ठाणे येथील समीक्षा कन्ट्रक्शनला देण्यात आला आहे. एका प्रभागासाठी एक वाहन अशा 51 रिक्षा फिरणार आहेत. कॉलनीत कोणत्या वेळेला गाडी येईल याची माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे. घंटागाडीची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. 31 ऑगस्टपासून शहरात घंटागाडी सुरू करण्यात येणार आहे. रविवार पेठेतील मनपाची जागा त्या कंपनीस कार्यालयासाठी देण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका उपायुक्त अनिल विपत यांनी दिली.