आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकासकांच्या समस्या सोडवणार - विजयकुमार काळम-पाटील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरातील विकासकांच्या (बिल्डर) समस्या सोडवण्याचा मनपा प्रयत्न करेल. प्रलंबित फाइलवर आठ दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मनपा आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी दिले.

शहराचा विकास करताना विकासकांना(बिल्डर) अनेक अडचणी येत अाहेत. त्यावर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी महापालिका आयुक्तांनी गुरुवारी विकासकांची बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने जागेचे एनए (बिनशेती) ना हरकत प्रमाणपत्र दिले. ते महापालिकेकडे आले आहे. त्यावर मनपा विकासन परवानगी देणार आहे.
विकासकांच्या खुल्या जागा एनए झाले नसताना त्यावर मनपा कर आकारणी करते. एनए नसलेल्या मिळकतीवर कर आकारणी करू नये,अशी सूचना त्यांनी केली.यावेळी मनपा नगर रचना अधिकारी महेश क्षीरसागर, डिस्ट्रिक्ट लॅन्ड डेव्हलपर्स असोसिएशनचे अध्यक्ष बसवराज देशमुख, महासचिव केदार बिराजदार, खजिनदार काकासाहेब पाटील, उपाध्यक्ष भीमाशंकर अक्कलवाडे, कार्यकारणी सदस्य मल्लिकार्जुन खेड, मारुती झांबरे, विजय मेहता, सुभाष घोडके, मल्लिकार्जुन अाकळवाडी आदी उपस्थित होते.

छाननी प्रक्रिया सुरू

वर्ग नगरपालिका हद्दीत जिल्हाधिकाऱ्यांना तर वर्ग नगरपालिका हद्दीत अपर जिल्हाधिकाऱ्यांना एनओसीचा अधिकार आहे. बार्शी पंढरपूर नगरपालिका वर्गातील आहेत. या प्रस्तावांची प्रशासन स्तरावर छाननी सुरू आहे. आठवडाभरात छाननी प्रक्रिया पूर्ण होईल. यानंतर एनओसी दिली जाईल. मनपा हद्दीतील ३० पैकी १५ प्रस्तावांची छाननी झालेली आहे.

प्रस्तावांची छाननी सुरू...

शहरातील ३५ पेक्षा अधिक प्रस्तावांना पत्र देण्यात आले आहे, नगरपालिका हद्दीतील प्राप्त प्रस्तावांची छाननी सुरू आहे. छाननीची प्रक्रिया पूर्ण होताच, त्यालाही एनओसी देण्यात येईल. तुकाराममुंढे, जिल्हाधिकारी.