आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युक्तिवादानंतर कोठे, चिनी यांचे अर्ज मंजूर, सोमवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिकेच्या प्रभाग चार १८ बच्या पोटनिवडणुकीसाठी १३ जणांनी १९ अर्ज दाखल केले होते. त्या अर्जाची छाननी शनिवारी निवडणूक निर्णय अधिकारी अमिता दगडे-पाटील यांनी केली. पक्षाच्या नावाने अर्ज भरले पण एबी फॉर्म नसल्याने तिघांचे अर्ज अवैध ठरले. तर अन्य नऊ जणांचे अर्ज वैध ठरवण्यात आले. महेश कोठे आणि कृष्णहरी चिनी यांच्या अर्जावर दोघांनी हरकत घेतली होती.
कोठे यांच्याकडून अॅड. अरविंद अंदोरे तर चिनीकडून अॅड. यु. एन. बेरिया यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर रात्री ९.४५ वाजता दोघांचे अर्ज मंजूर करण्यात येत असल्याचे दगडे यांनी जाहीर केले. अवैध ठरलेल्या तिघांमध्ये छाया कांबळे, सुनीता मंजुळे (दोघे काँग्रेस) तर मनसेचे अर्जुन राठोड यांच्या अर्जाचा समावेश आहे. महेश कोठे यांना पूरक असलेला प्रथमेश कोठे यांचा अर्ज आपोआप अवैध ठरला. नऊजण निवडणुकीस पात्र असून त्यात प्रभाग चार साठी तिघे तर प्रभाग १८ साठी सहाजण रिंगणात आहेत. सोमवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असल्याने त्यानंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
प्रभाग १८ : वैध अर्ज : महेशकोठे (शिवसेना), कृष्णजी चिनी (काँग्रेस), अंबादास गुडूर (अपक्ष), म. युसूफ शेख (मार्क्सवादी), मल्लिकार्जुन कोंका (परिवर्तन समाता पार्टी), इरफान शेख (अपक्ष).
अवैधअर्ज : प्रथमेशकोठे (शिवसेना), अर्जुन राठोड (मनसेचे एबी फार्म नाही).

सोमवारी अर्ज माघारीचा दिवस
दोन्हीप्रभागासाठी वैद्य झालेल्या उमेद् वारांना अर्ज मागे घेण्यासाठी सोमवारी दुपारी तीन पर्यंत मुदत आहे. त्यामुळे सोमवारी अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. मंगळवारी सकाळी चिन्ह वाटप करण्यात येणार आहे.
११ तास छाननी प्रक्रिया
महेशकोठे आणि कृष्णाजी चिनी यांनी एकमेकाच्या अर्जावर हरकत घेतली होती. त्यावरून शनिवारी सकाळी ११ पासूनरात्री दहापर्यंत ११ तास प्रक्रिया चालली. रात्री दहा वाजता दोन्ही अर्ज मंजूर असल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी अमिता दगडे- पाटील यांनी जाहीर केले.
प्रभाग : वैध अर्ज : कांताभोसले (भाजप), पद्मावती गज्जम (काँग्रेस), अनिता साळुंके (अपक्ष).
अवैधअर्ज : छायाकांबळे, सुनिता मंजुळे (दोघे काँग्रेसचे एबी फार्म दिले नाहीत
बातम्या आणखी आहेत...