आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर महापालिकेची अंदाजपत्रकीय सभा लवकर घेण्याची सूचना

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महापालिका अंदाजपत्रकीय सभा लवकर आणि वेळेच्या आत घेऊन संपवावी. त्यासाठी तत्काळ बजेट सभा घेण्याची सूचना करण्यात आल्याची माहिती, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष धर्मा भोसले यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. तर महापौर अलका राठोड, सभागृह नेता महेश कोठे, उपमहापौर हारून सय्यद, राष्ट्रवादी गटनेता दिलीप कोल्हे यांना पक्षाकडून सोमवारी पत्र पाठवून मागणी करणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी दिली.

शहर कॉंग्रेसध्यक्ष धर्मा भोसले म्हणाले, ‘‘महापालिका बजेट दोन दिवस आधी घ्यावे, अशी भावना नगरसेवकांची आहे. त्यानुसार 28 आणि 30 मार्च रोजी बजेट सभा घ्या. शिक्षण मंडळ आणि परिवहनवर चर्चा घडवा अशी सूचना महापौर आणि सभागृह नेत्यांना देण्यात आल्या आहेत.’’

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष महेश गादेकर म्हणाले, ‘‘बजेट कळण्यासाठी सविस्तर आणि दोन दिवस चर्चा होणे अपेक्षित आहे. हा मुद्दा रास्त आहे. यासाठी राष्ट्रवादी कडून मी महापौर, उपमहापौर, सभागृह नेता, राष्ट्रवादी गटनेता यांच्याशी पत्र व्यवहार करणार आहे. बजेट सभा दोन दिवस आणि सविस्तर चर्चा करण्यासाठी प्रयत्न आहे. यामुळे नवीन नगरसेवकांना बजेट काय आहे हे कळून येईल. दोन दिवस बजेट सभा व्हावी ही मागणी राष्ट्रवादीची आहे.’’
कॉंग्रेस
पक्षाने योग्य निर्णय घ्यावा.’’ उदय चाकोते
नियमानुसार सभागृहात कामकाज आणि चर्चा झाली पाहिजे.’’ श्रुती मेरगु
मागील बजेट अद्याप मिळाले नाही. बजेटवर सविस्तर चर्चा करा.’’ र्शीदेवी फुलारे
बजेट सभा लवकर व्हावी असे वाटते. नवीन नगरसेविकांना कळेल.’’ कल्पना यादव
शिक्षण आणि परिवहनवर चर्चा होत नाही. बजेट सभेत ठरावीक नगरसेवक बोलतात. ते मोडीत काढा.’’ चेतन नरोटे
बजेट सभा दोन दिवस चालल्यास अनुभव मिळेल. 80 टक्के नगरसेवक नवीन आहेत.’’ सरस्वती कासलोलकर
बजेटची माहिती आम्हाला मिळत नाही. बजेट म्हणजे काय? ’’ अनिता म्हेत्रे
भाजप
बजेट लवकर व्हावे या मताचा मी आहे. दोन दिवस बजेट सभा चालल्यास नागरिकांनाही कळेल.’’ नागेश वल्याळ
बजेट सभा लवकर होण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.’’ जगदीश पाटील
महिलांना बजेट कळू द्या. महिलांसाठी बजेटमध्ये तरतूद ठेवा.’’ सुवर्णा हिरेमठ
राष्ट्रवादी
सर्वसामान्यांना शहराचे बजेट कळू द्या.’’ पीरअहमद शेख
बजेट सभा 25 मार्चला घेणे अपेक्षित आहे. अजूनही वेळ गेलेली नाही.’’ सुनीता रोटे
सभा गुंडाळण्याचा प्रयत्न असतो हे संपूर्ण शहराला कळून चुकले आहे. नगरसचिवांना पत्र देणार आहे.’’ आनंद चंदनशिवे (बसपा)
बजेट 31 मार्चलाच का?
रात्री 12 ही वेळ योग्य नव्हे
नगरसेविकांवर कौटुंबिक जबाबदार्‍या असतात. त्याचे भान ठेवून त्यांना रात्री 12 वाजपर्यंत थांबवणे योग्य नाही. शासकीय कार्यालयात महिलांना सहानंतर थांबवल्यास त्यांना घरी सोडण्याची जबाबदारी त्या कार्यालयाची आहे. या पार्श्वभूमीवर रात्री 12 वाजपर्यंत थांबवणे योग्य नसल्याचे अनेक नगरसेविकांनी सांगितले