आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर : पालिका झोन सभापती निवड मंगळवारी होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिकेच्या आठ झोन समिती सभापतींची निवड मंगळवारी करण्यात येणार आहे. त्यासाठी सोमवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. यासाठी पीठासन अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी असणार आहेत.
महापालिकेचे मिनी महापौर म्हणून आठ झोन समिती सभापतींना ओळखले जाते. सोमवारी सकाळी ११ ते दुपारी यावेळेत नगरसचिव ए. ए. पठाण यांच्याकडे सभापती पदासाठी अर्ज दाखल करता येईल. मंगळवारी सकाळी १०.३० पासून ४५ मिनिटांच्या अंतरावर एक ते अाठ झोन समिती सभापतींची निवड करण्यात येईल. पीठासन अधिकारी म्हणून जि. प. कार्यकारी अधिकारी काकाणी असतील.