आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर नगरसेविकांचा गुजरात दौरा झाला रद्द

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - नगरसेविकांचा नियोजित गुजरात दौरा तूर्त स्थगित करण्याचा निर्णय महापालिका महिला बालकल्याण समितीच्या सभेत शुक्रवारी घेण्यात आला. दौऱ्यासाठी मनपा तिजोरीतून ३.२५ लाख खर्चले जाणार होते.
आता त्या रकमेतून उपक्रम राबवण्याचे ठरले. सभापती खैरुन्निसा शेख यांच्या उपस्थित बैठक झाली. मनपाच्या वतीने फेब्रुवारीत फूड फेस्टिव्हल घेण्याचे ठरले. घरेलू कामगार महिलांसाठी शिवणवर्ग घेणे, शिवणयंत्र सायकल वाटप करणे आदी विषय मंजूर करण्यात आले.