आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हरवलेली बॅग नेणारा सीसीटीव्हीत कैद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - रायचूर-विजापूर या पॅसेंजर रेल्वेमधून प्रवास करणा-या महिलेची बॅग हरविल्याची घटना घडली. त्यात चार तोळे दागिने होते. दरम्यान, सोलापूर स्थानकावरून ती बॅग नेणारा सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये कैद झाला आहे.
सपना शैलेंद्र किवडे (रा. सेडम, गुलबर्गा) यांनी सोलापूर रेल्वे पोलिसांत फिर्याद दिली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमाराला घडली. किवडे या रायचूर-विजापूर गाडीने प्रवास करीत होत्या. कुमठे स्थानकावर त्या उतरल्या, पण बॅग गाडीतच विसरल्या. नातेवाइकांच्या घरी गेल्यानंतर बॅग विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या सोलापूर स्थानकावर आल्या. मात्र, तोपर्यंत गाडी विजापूरकडे रवाना झाली होती. पोलिसांना या घटनेची कल्पना दिल्यानंतर त्यांनी रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीच्या फुटेजची पाहणी केली. जिन्यावरून उतरताना त्यांची बॅग एका व्यक्तीच्या हातात असल्याचे चित्रण झाले आहे. त्या आधारे पोलिस तपास करीत आहेत. श्रीमती किवडे यांच्या बॅगेत चोर तोळे सोन्याच्या दागिन्यांसह कानातील दोन वेल आणि दीड हजार रुपये होते.