आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर क्राइम : रविवारपेठेत तरुणाचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - पद्मशाली संस्थेच्या कार्यालयाजवळील एका विहिरीत पडून बुद्धप्पा शंकर जाधव (वय 35, रा. रविवारपेठ) या तरुणाचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी आठला ही घटना उघडकीस आली. जाधव हा पाय घसरून पडला आहे की, विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. याचा तपास सुरू असल्याचे जेल रोड पोलिसांनी सांगितले.

तरुणाची आत्महत्या

आमराई क्रांतिनगर झोपडपट्टी भागात राहणारा र्शीनिवास हणमंतू कोळी (वय 40) या तरुणाने घरी गळफास घेऊन आत्महत्या केला. ही घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. फौजदार चावडी पोलिसांत याची नोंद आहे.

हॉटेलातून गॅस टाक्या पळवल्या

गॅस सिलिंडर कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगून दोघा तरुणांनी रसिक डायनिंग हॉटेलमधून तीन गॅस सिलिंडरच्या टाक्या पळवल्या. मंगळवारी फौजदार चावडी पोलिसांत विनायक परदेशी यांनी फिर्याद दिली आहे. विशाल मोहन चव्हाण (रा. पंढरपूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्याला कुमार शिवाजी जिरपे (रा. भवानीपेठ) या तरुणाने मदत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चव्हाण हा हॉटेलात आला होता. गॅस कंपनीचा ड्रेसही घातला होता. सिलिंडर भरून आणतो म्हणून टाक्या घेऊन गेला.