आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाच्या खुनाचा तपास लागेना, दहा दिवसांत इतर दोघांचाही संशयास्पद मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - विजापूर रस्त्यावरील हत्तूरजवळ एका तरुणाचा खून करून त्याचा मृतदेह टाकून देण्यात आला होता. या घटनेला आता महिना उलटला तरी त्याचे नाव निष्पन्न झाले नाही. विजापूर नाका पोलिसांनी कर्नाटकात जाऊनही तपास केला तरी ओळख पटली नाही. याशिवाय शहरात गेल्या दहा दिवसांत दोघांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्याच्याही मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नाही.

29 मे रोजी शासकीय रुग्णालयातील आवारात गुरुबाई रेवप्पा आयगोळे (वय 42, रा. कुंभार गल्ली, सोलापूर) या महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला होता. नेमका त्यांचा मृत्यू कशामुळे झाला, याची माहिती उघड झाली नाही. पोलिसांनी व्हिसेरा तपासण्यासाठी पाठवून दिला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर खरे कारण समोर येणार असल्याचे सदर बझार पोलिस सांगतात. 8 जून रोजी रेल्वे स्टेशनजवळील सिमेंट मालधक्क्याजावळ सैफन दस्तगीर अत्तार (वय 45, रा. हत्तूर, सोलापूर) या कामगाराचा मृत्यू झाला होता. नेमका त्यांच्याही मृत्यूचे कारण समोर आले नाही. व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. रेल्वे पोलिसात नोंद आहे. दरम्यान, विजापूर नाका पोलिसाच्या हद्दीत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली नाही. तपास सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक विकास रामगुडे यांनी सांगितले.