आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Crime Four Arrested For Theft And Robbery

मौजमजा करण्यासाठी वाटमारी करायचे ‘ते’ तरुण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - मौजमजा करण्यासाठी व हॉटेलात चमचमीत जेवणासाठी पाच तरुणांनी रस्त्यावरून ये-जा करणार्‍या व्यक्तींना धमकाविणे, मारहाण करणे, निर्मनुष्य ठिकाण पाहून मोबाइल, पैसे पळविणे असे कृत्य करणार्‍या चार तरुणांना फौजदार चावडी पोलिसांनी रविवारी जेरबंद केले होते. त्यांच्या तपासात या बाबी समोर आल्याचे पोलिससूत्रांनी सांगितले. सापडलेल्या चौदा मोबाइलवरून मोबाइलधारकांचा शोध घेण्यात येत आहे.

हरिष दत्तात्रय सुरवसे (वय 24, रा. तुळजापूरवेस, सोलापूर) याला आज न्यायाधीश ए. ए. शिंदे यांच्या न्यायालयात हजर केल्यानंतर दोन दिवस (दि. 12 जून) पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. अन्य तिघेजण अल्पवयीन असल्यामुळे त्यांना बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे.

रामबाबू यादव (रा. बिहार, हल्ली, फताटेवाडी, सोलापूर) यांना रविवारी सकाळी भागवत टॉकीज परिसरात मारहाण करून पैसे व मोबाइल पळविण्यात आले होते. शनिवारी रात्री गौरीशंकर पाटील (रा. कारंबा) यांना गणपती घाटजवळ मारहाण करून पैसे व मोबाइल काढून घेण्यात आले होते. या दोन्ही घटनांचा तपास करताना फौजदार चावडी पोलिसांनी गणपती घाटजवळ चौघांना अटक केली होती. सरकारततर्फे अँड. सार्थक चिवरी यांनी काम पाहिले.