आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काळवीट शिकार; तपास थंडावला, माजी आमदाराच्या मुलाचा आरोपींमध्ये समावेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - दीड महिन्यांपूर्वी वटवटे-जामगाव (ता. मोहोळ) येथील शिवारात झालेल्या दोन काळविटांच्या शिकारीचा तपास थंडावला आहे. वरिष्ठ वनअधिकार्‍यांसमोर जबाब नोंदणीसाठी जामिनावर सोडलेले आरोपीही गैरहजर राहिले. कोल्हापूर जिल्ह्यातील माजी आमदाराच्या मुलाचा त्या आरोपींमध्ये समावेश असल्याने तपास थंडावल्याची चर्चा आहे. आषाढ महिन्याची सुरुवात होताच मांसाहारासाठी काळविटाची शिकार करण्यासाठी ते कोल्हापुरातून वटवटे येथे आले होते. कोल्हापुरातील माधव यादव हा त्याचा नातेवाईक रणजित विजयसिंग यादव व बांधकाम व्यवसायिक मित्र विक्रम पाटील यांनी कामती येथील मंजूर नावाच्या एका तरुणाच्या मदतीने दोन काळविटांची शिकार केली. रात्रीची गस्त घालणार्‍या पोलिसांनी त्यांच्या मारलेल्या काळविटांसह ताब्यात घेतले. त्यांच्यासोबत असणारे सज्रेराव पाटील व मंजूूर मुजावर हे सहकारी पळून गेले होते. त्यांना पोलिसांनी कोल्हापुरात जाऊन अटक केली. त्यांच्याकडून शिकारीसाठी वापरलेली बंदूक जप्त करण्यात आली. त्या काळविटांचा बंदुकीच्या गोळीनेच मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद आहे. त्या पाचही आरोपींची चार-आठ दिवसात जामिनावर सुटका झाली. तेव्हापासून त्या घटनेचा तपासही थंडावला आहे.

पुराव्याअभावी आरोपींना जामीन : साहाय्यक उपवनसंरक्षक सुवर्णा झोळ या मंगळवारी सकाळी कामती पोलिस स्टेशनमध्ये दिवसभर बसून होत्या. पण, जबाबासाठी आरोपी आलेच नाही. तसेच, घटनेला दीड महिन्यांचा कालावधी लोटला असून अद्यापही दोषारोपपत्र दाखल झाले नाही. शिकार प्रकरणातील आरोपी माजी आमदाराचा मुलगा आहे. पोलिसांनी भक्कम पुरावे जमा न केल्यामुळेच आरोपींना तत्काळ जामीन मिळाला. त्यामुळे प्रकरण दडपण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे.

आरोपपत्र तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात
पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली बंदूक ताब्यात घेतली. आरोपींकडे शस्त्राचा परवाना आहे. पण, गुन्ह्यात वापरेली बंदूक परवान्याची नव्हती. त्यांच्या विरोधातील आरोपपत्र तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ते दाखल होईल.’’
अशोक सायकर, साहाय्यक पोलिस निरीक्षक