आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सीना नदीच्या पुलावर लिफ्ट मागितली अन् चालकाला मारहाण करून तवेरा पळविली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - विजापूर बसस्थानक येथे एका तरुणाने तवेरा चालकाला लिफ्ट मागितली. दोघेजण सोलापूरजवळील सीना नदीच्या पुलापर्यंत आले. तरुण लघुशंकेचा बहाणा करून खाली उतरला. त्याठिकाणी पूर्वीच दबा धरून बसलेल्या त्याच्या तीन साथीदारांनी मिळून तवेरा चालकाला बेदम मारहाण करून गाडी पळविली. ही घटना शनिवारी रात्री दहाच्या सुमाराला घडली. अब्दुल रौफ अगसवाल (रा. वनकाजरी दर्गा, विजापूर, कर्नाटक) याने विजापूर नाका पोलिसात फिर्याद दिली आहे. हा गुन्हा विजापूर शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

अब्दुल हा तवेरा कार (केए 02 एमए 7620) घेऊन विजापूरहून सोलापूरकडे येत होता. बसस्थानकाजवळ एका तरुणाने सोलापूरपर्यंत त्याला लिफ्ट मागितली. दोघे रात्री दहाच्या सुमाराला सोलापूरजवळील सीना नदीच्या पुलावर आल्यावर तरुण लघुशंकेसाठी खाली उतरला. त्यापूर्वीच तिघे तरुण झाडीत लपून बसले होते. काही कळायच्या आतच चौघांनी अब्दुलला बाजूच्या शेतात नेऊन हॉकी स्टीकने हल्ला चढवला. मारहाणीत तो बेशुद्ध पडला. त्याच्याजवळील बाराशे रुपये व मोबाइल घेऊन चौघांनी कारसह पोबारा केला. काही शेतकर्‍यांनी तरुण बेशुद्ध पडल्याचे पाहून विजापूर नाका पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी आल्यानंतर जखमीला शासकीय रुग्णालयात दाखल केले. नातेवाइकांना माहिती दिली. प्राथमिक उपचारानंतर त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.