आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मटकाकिंग हयातच्या चाैकशीसाठी हाणामारी, तीन पाेलिस निलंबित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मटकाकिंग हयात विजापूरे याची चौकशी करण्याच्या वादातून पोलिस ठाण्यात हाणामारी करणारे सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत माळी, फौजदार गंगाधार जोगदनकर यांच्यासह पोलिस निरीक्षक जयवंत खाडे यांना बुधवारी निलंबित करण्यात आले. तिघांना दररोज पोलिस नियंत्रण कक्षात हजेरी लावण्याची अट आहे. पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी ही कारवाई केली.

मागील आठवड्यात जोगदनकर व त्यांच्या पथकाने विजापूरेच्या साथीदाराला मटक्याची चिठ्ठी व पैसे घेऊन जाताना पकडले होते. याप्रकरणात विजापूरेवरही गुन्हा दाखल झाला होता. जोगदनकर यांच्याकडे याचा तपास होता. दुसर्‍या दिवशी विजापूरेला पोलिस ठाण्यात आणून माळी चौकशी करीत होते. त्याचवेळी जोगदनकर ठाण्यात आले. ‘हा तपास माझ्याकडे असताना तुम्ही चौकशी कसे काय करता,’ असे म्हणत त्यांनी जाब विचारला. त्यावेळी माळी व जाेगदनकर यांच्यात बाचाबाची झाली. हाणामारीनंतर पोलीस उपायुक्त अश्विनी सानप यांनी दोघांची बाजू ऐकून घेतली. संपूर्ण घटनेचा अहवाल पोलिस आयुक्तांनी मागावून घेऊन ही कारवाई केली. तिघांना निलंबीत करण्यात आल्याचे सेनगावकर यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...