आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

2 लाख रुपयांच्या बांगड्या चोरांनी दिवसा पळवल्या; दुचाकीची पर्सही पळवली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - पुढे गोंधळ सुरू आहे. काहींचे दागिने पळविले आहेत. तुम्ही दागिने काढून ठेवा म्हणून छायाबाई अक्कलकोटे (रा. अरिहंत अपार्टमेंट, चाटला चौक) यांच्या हातातील साडेसहा तोळे सोन्याच्या बांगड्या दोघांनी बतावणी करून पळवल्या. ही घटना सोमवारी दुपारी एक़च्या सुमाराला बाकळे कटपीस समोरील जोडभावीपेठ चौकात घडली. जोडभावी पोलिसात मंगळवारी फिर्याद दिली आहे. साहित्य खरेदीसाठी महिला बाजारात निघाल्या होत्या. त्यावेळी दोघे तरुण मोटारसायकलवर आले. त्यांना खोटी बतावणी करून दागिने काढून घेतले. ते कागदात बांधून देण्याचा बहाणा करून पळून गेले. बाजारभावाप्रमाणे दागिन्यांची किंमत दोन लाख रुपये होते.

दागिन्यांची बॅग पळविली

पूर्व मंगळवारपेठेत दुचाकीला (एमएच 13 के 5324) लावलेल्या बँगेतून सोन्याचे दागिने, दहा हजार रुपये, बँकांचे एटीएम कार्ड चोरांनी पळविले. दत्तात्रय गायकवाड (रा. मंत्री-चंडकनगर) यांनी जोडभावी पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना चोवीस ऑगस्ट रोजी सायंकळी साडेपाचला पूर्व मंगळवारपेठेत घडली. बँगेत कर्णफुले, बंगाली कानातील टॉप्स, अंगठय़ा असे दोन तोळे दागिने, रोख रक्कम बॅगेत होती.