आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीचा छळ, पोलिस पतीस अटक;रेल्वे पुलावरून पडल्याने तरुणाचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - लग्नात मानपान केला नाही. माहेरहून पैसे व दागिने आण या कारणावरून सासरी होणार्‍या छळास कंटाळून पोलिस पत्नी स्मिता अशोक चव्हाण (वय 26, रा. विरागनगर, पोलिस वसाहत, घाटकोपर, मुंबई, हल्ली वसंतनगर पोलिसलाइन सोलापूर) यांनी सदर बझार पोलिसांत फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पोलिस पतीसह तिघांना अटक झाली.

अशोक महादेव चव्हाण (वय 30, रा. घाटकोपर पोलिसलाइन मुंबई ), प्रेमाबाई महादेव चव्हाण (रा. शिवाजीनगर, अक्कलकोट), सुमिता राठोड (रा. मुळेगाव, ता. दक्षिण सोलापूर ), सुनीता राठोड (रा. रत्नागिरी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. प्रेमाबाई व सुमिता या दोघींना अटक झाल्याची माहिती फौजदार गोविंद कदम यांनी दिली. अशोक व स्मिता या दोघांचा विवाह 21 डिसेंबर 2000 रोजी झाला. स्मिता यांचे वडीलही विजापूर नाका पोलिस ठाण्यात हवालदार आहेत. पती अशोक हे मुंबईत पोलिस शिपाई आहेत. लग्नानंतर एक महिनाभरात सासरी जाचहाट व त्रास सुरू झाला. सोमवारी सकाळी पतीसह चौघे वसंतनगर येथील घरी आले. बाटलीत आणलेले द्रव्य त्यांना पाजण्याचा प्रयत्न केला. त्यांनी झटका मारून थेट सदर बझार पोलिस ठाणे गाठले. याचवेळी अशोक यांनी फरशीच्या तुकड्यांनी मारहाण केली. त्यात मावस सासू जखमी झाली आहे. वडील व भाऊ नोकरी कसे करतात, बघून घेतो म्हणून धमकी दिली. आईच्या सांगण्यावरून मला त्रास देण्यात येत होता. लग्नात घातलेले सात तोळे दागिने काढून घेऊन नणंद सुनीता यांना ट्रॅक्टर घेण्यासाठी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

रेल्वे पुलावरून पडल्याने तरुणाचा मृत्यू

होटगीजवळील रेल्वे रूळाच्या शेजारील पुलावरून खाली पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी दहाच्या सुमाराला घडली. दत्ता सेवक गायकवाड (वय 40, रा. होटगी स्टेशन, ता. दक्षिण सोलापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो सकाळी नऊच्या सुमाराला होटगी स्टेशनजवळील रेल्वे पुलावर बसला होता. तोल जाऊन खाली पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचाराला शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. सिव्हिल पोलिस चौकीत या घटनेची नोंद आहे.

विद्यानगरात घरफोडी,63 हजारांचा ऐवज लंपास

उत्तर सदर बझार परिसरातील विद्यानगर भाग दोन येथे राहणारे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचे चिरंजीव अजित फडकुले यांच्या घरी चोरी झाली आहे. ते परिवारासह थायलंड येथे प्रवासासाठी गेले होते. 22 जुलै रोजी ते घरी आल्यानंतर घराचा मुख्य दरवाजा उचकटून कपाटातील सोन्याचे दागिने व 23 हजार रुपये असा एकूण 63 हजारांचा ऐवज पळवून नेल्याचे फिर्यादित अजित फडकुले यांनी म्हटले आहे. सोमवारी याबाबत सदर बझार पोलिसात फिर्याद देण्यात आली. साहाय्यक फौजदार बाबर तपास करत आहेत.

जोडभावी पेठेतील तरुणाला मारहाण

मागील भांडणावरून बालाजी दोंता (रा. जोडभावी पेठ, सोलापूर) यांना पाचजणांनी मिळून मारहाण केली. तसेच तुळजापूर रस्त्यावरील उळेगावजवळ स्कॉर्पिओतून नेऊन पुन्हा मारहाण केल्याची फिर्याद दोंता यांनी जोडभावी पोलिसात सोमवारी दिली आहे. कन्ना चौकात रविवारी रात्री ही घटना घडली होती. र्शीनिवास संगा व त्याच्या चार साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. साहाय्यक पोलिस निरीक्षक कोळी तपास करत आहेत.