आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्दीचा धाक हरवल्याने चोर सोकावले!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापुरातील पोलिस यंत्रणा जणू कोलमडली आहे. पोलिस आयुक्तांचा यंत्रणेवरील कामाचा दरारा कमी झाला आहे की काय अशी परिस्थिती आहे. पोलिस निरीक्षक, साहाय्यक आयुक्त, उपायुक्त, कर्मचार्‍यांवर कामाची जबाबदारी असताना ते काय काम करतात याची पाहणी होते का ? पोलिस आयुक्त प्रदीप रासकर यांनी कामाच्या नियोजनात सुसूत्रपणा आणल्याचे सांगण्यात येते. पण प्रत्येक कामात तसे चित्र दिसत नाही. दररोज चोर्‍या, घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. नागरिकांच्या जीविताची सुरक्षा आणि मालमत्तेच्या संरक्षणाच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन होत असल्याने उच्च न्यायालयातच का दाद मागू नये, असा सवाल केला जात आहे. पोलिस नावाची यंत्रणा चोरट्यांपुढे हतबल झाल्याची गत आहे. हाती असलेल्या दंडुक्याचा वापर योग्य ठिकाणी नसल्याचे हे द्योतक आहे. नागरिकांनी आपले दाग-दागिने, पैसा, मालमत्ता सांभाळून ठेवण्यासाठी खासगी सुरक्षा यंत्रणा बाळगावी अशीच वेळ आली आहे.

गस्तीत ढिलाई का आली
सोलापूरचे पोलिस संख्याबळ दोन हजार आहे. सात पोलिस ठाणी. पाकणी, हगलूर, मुळेगाव क्रॉस रस्ता, सिध्देश्वर साखर कारखाना, हत्तूर, डोणगाव इथंपर्यंत शहराची हद्द. जुळे सोलापूर, हद्दवाढ भागात नागरी वस्ती वाढली आहे. विरळ वस्ती, अंतर्गंत रस्ते नाहीत, पथदिवे बंद असतात या सर्वांमुळे पोलिसांना गस्त देण्यात अडचणी आहेत. हे कारण आता पोलिसांना सांगून चालणार नाही. प्रत्येक पोलिस ठाणे अंतर्गत रात्र गस्तसाठी दहा कर्मचारी असतात. कमांडो व गुन्हे शाखचे कर्मचारी मिळून सुमारे शंभर पोलिस कर्मचारी, पोलिस ठाणे अंतर्गंत फौजदार ते निरीक्षक या दर्जाचा एक अधिकारी, विभाग एक व दोन या अंतर्गंत एक निरीक्षक दर्जाचा अधिकारी यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपायुक्त किंवा साहाय्यक आयुक्त दर्जाचा एक अधिकारी असतो. रात्रीचे गस्त पथक शेवटच्या घरापर्यंत जात नसल्यामुळे गस्त सक्षम नाही. चोरांवर वचक नाही. पोलिसांना पोलिस ठाण्यात दिवसभर काम करून कधी-कधी रात्र गस्त देण्यात येते. त्यावेळी पोलिसांची मानसिकता गस्त देण्यासारखी नसते. गुन्हे शाखेचे पथकही चोरांच्या मागावर राहून काम करीत नाहीत. त्यांच्याकडून रेकॉर्डवरील गुन्हेगार, बसस्थानक, रेल्वे स्थानक, शहरातून जाणारे मुख्य मार्ग यावर नाकाबंदी होत नाही. संशयित व्यक्तींची, रात्री उशिरा रस्त्यावर फिरणारे यांची तपासणी होत नाही. यामुळे चोरांवर वचक नाही.

या भागांत होतात सर्वाधिक चोर्‍या
जुळे सोलापूर, विजापूर रोड, होटगी रोड, सम्राट चौक, मुरारजी पेठ, कुमठा नाका, कर्णिक नगर, विडी घरकुल, अशोक चौक या भागांत चोर्‍यांचे प्रमाण आहे. विजापूर नाका, एमआयडीसी, फौजदार चावडी या पोलिस ठाण्याची हद्द मोठी आहे. चोर्‍याही मोठय़ा स्वरूपात आहेत. सलगर वस्ती, जोडभावी, जेल रोड, सदर बझार या हद्दीत कमी प्रमाण आहे. सलगर वस्तीत चोरीचे प्रमाण नगण्य आहे.

पुढील स्लाइडमध्ये, पोलिस आयुक्तप्रदीप रासकर यांना थेट सवाल.