आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्केट यार्डाच्या पाठीमागे चाकू दाखवून युवकाची लूट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - मार्केट यार्डाच्या पाठीमागील 256 गाळा परिसरात (एक्कलदेवी पिठाची गिरणी बोळात) सायकलवरून जाताना एका तरुणाने चाकूचा धाक दाखवत मोबाइल, पैसे पळवले. ही घटना सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. सुरेश पांडुरंग इगे (वय 27, रा. सागर चौक, विडी घरकुल) याने जेल रोड पोलिसांत फिर्याद दिली.

शनिवारी गणपती घाट, रविवारी भागवत टॉकीज परिसरात मारहाण करून पैसे, मोबाइल पळवण्यात आले होते. ही तिसरी घटना आहे. संशयित गणेश नागनाथ चौगुले (वय 25, रा. जोशी गल्ली, जुना बोरामणी नाका) याला अटक झाली आहे. सुरेश चुलत भाऊ राजेशसोबत जात होता. त्यांच्या सायकलला गणेशने धडक दिल्यानंतर शिवीगाळ केली. चाकूचा धाक दाखवून सहा हजार रुपयांचा मोबाइल, 300 रुपये काढून घेतले. जीवे मारण्याची धमकीही दिली. यानंतर सुरेश यांनी जेल रोड पोलिस ठाणे गाठले. सांगितलेल्या वर्णनावरून पोलिसांनी संशयिताला जेरबंद केले.

गणेश रेकॉर्डवरचा संशयित
फौजदार एल. बी. डाके व त्यांच्या पथकाने चौकशी सुरू केल्यानंतर जोशी गल्लीतील गणेशचे नाव समोर आले. त्याची माहिती घेत असताना तो मार्केट यार्डाजवळ थांबल्याची माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर गुन्ह्याची कबुली दिली. चोरलेला मोबाइल, पैसे जप्त करण्यात आल्याचे र्शी. डाके यांनी सांगितले. गणेश हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. यापूर्वी पोलिसांनी त्याला अनेकदा जेरबंद केल्याचे सांगण्यात आले.

गस्त वाढवणार : बुरसे
शहरातील वाटणारीच्या या घटना पाहता गर्दीची ठिकाणे, बाजारपेठ, बागा, मंदिर परिसरात पेट्रोलिंग, साध्या वेशातील पोलिस यांचा बंदोबस्त आजपासून देण्यात आला आहे. सातही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत तपासणी मोहीम, गस्त देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.’’ सुभाष बुरसे, पोलिस उपायुक्त,