आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन चोरटे अटकेत; लाखाचा ऐवज जप्त

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - न्यू पाच्छा पेठ, दत्तनगर परिसरातील देवी मंदिर, शिवलिंग मंदिर, शिव माहेश्वरी देवी मंदिरात चोरी झाली. ही घटना शनिवारी उघडकीस आली. दोन्ही घटनेत सुमारे एक लाखाहून अधिक मुद्देमाल चोरीस गेला आहे. देवीच्या अंगावरील दोन तोळे दागिने चोरीस गेले आहेत. ही घटना शनिवारी घडली.

पहिली घटना : सोमनाथ चौगुले (रा. भारतरत्न इंदिरानगर, सोलापूर) यांनी जेल रोड पोलिसात फिर्याद दिली आहे. ज्योती तरुण मंडळाच्या देवी मंदिरात व साईबाबा नवरात्र मंडळ मंदिराचा मुख्य दरवाजा उचकटून, कुलूप कटावणीने तोडून देवीच्या अंगावरील दोन तोळ्याची कर्णफुले, चार हजार रुपये, दान पेटीतील साडेपाच हजार रुपये असा ऐवज चोरांनी पळवला. दुसरी घटना : दत्तनगर न्यू पाच्छा पेठ मैदानातील शिवलिंग मंदिर, दत्त नवरात्र महोत्सव मंडळाचे शिवमाहेश्वरी देवी मंदिरात चोरी झाली आहे. ही घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. अशोक बल्ला यांनी जेल रोड पोलिसात फिर्याद दिली आहे. पंचधातूचे किरीट, चांदीचे शंख, 80 हजार रुपये असा ऐवज चोरीस गेला आहे. मंदिराचे कुलूप कटावणीने तोडून चोरी केल्याचे पोलिसांनी सांगितले.

अटकेतील दोघे अल्पवयीन

मंदिरातील चोरीप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने दोघा अल्पवयीन मुलांना अटक केली आहे. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाजवळील हवामान कार्यालयाजवळ दोघे अल्पवयीन मुले मोटारसायकलवर थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सापळा रचून ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांनी चोरीची कबुली दिली. एमआयडीसी परिसर रंगराजनगरात चोरलेली मोटारसायकल (एमए 13 एएम 1946) व भुलाभाई चौकातील मोटारसायकल (एमएच 13 एआर 0873) चोरल्याचे दोघांनी कबुली दिली. तसेच चोरीप्रकरणातील पंचधातू किरीट, चांदीचा नूपुर, चांदीचा शंख, अलंकार, दोन मोटारसायकली ताब्यात घेतल्या. याची माहिती पोलिस निरीक्षक नितीन कौसडीकर यांनी दिली. हवालदार मुन्शी, युसूफ शेख, मल्लिकार्जुन सोनार, गावीत, प्रतुल सुरवसे, प्रकाश राजगे, सुरेश वाघमारे, लक्ष्मीकांत फुटाणे, लक्ष्मण उडाणशिव, हब्बू, सिद्धप्पा पाटील या पथकाने पार पाडली.