आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आराखड्यावरून पक्षीय राजकारण पेटण्याची चिन्हे, समितीत न घेतल्याने नगरसेवकांची नाराजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जुळे सोलापूर विकास आराखड्यावर स्थायी समिती सदस्याची समिती गठित करण्यावरून काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपमध्ये पक्षाअंतर्गत शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले आहे. काँग्रेसमध्ये ताकमोगे-कोठे, राष्ट्रवादीत काळे-कोल्हे आणि भाजपमध्ये पाटील-काळे यांच्यातील कलगीतुरा रंगत आहे. त्यामुळे बर्‍याच दिवसांपासून शांत असलेले पक्षीय राजकारण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
काँग्रेस : गट-तटाची मोहीम
जुळे सोलापूर विकास आराखड्यावरून आमदार दिलीप माने यांच्याविरुद्ध महापालिका सभागृह नेते महेश कोठे यांच्या गटात राजकीय संघर्ष पुन्हा दिसून येत आहे. दोन महिन्यांपूर्वी 24 नगरसेवकांच्या गटाने कोठे हटाव मोहीम सुरू केली होती. आमदार प्रणिती शिंदे यांच्या कानपिचक्याने हा विषय थांबला. आता जुळे सोलापूर विकास आराखड्यात जुळे सोलापुरातून प्रतिनिधीत्व करणारे आमदार माने गटाचे म्हणून ओळखले जाणारे नगरसेवक ताकमोगे यांना वगळल्याने अंतर्गत वाद उफाळून आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस : अंतर्गत वाद रंगणार
यंदा स्थायी समिती सभापतिपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. पण, सभापती निवडीवरून नाना काळे नाराज झाले आहेत. त्यामुळे काळे यांना समितीत घेणे हे अडचणीचे ठरू शकते. काळे हे नेहमीच महेश कोठे, दिलीप कोल्हे यांच्या विरोधात राजकारण करीत असल्याने त्यांना वगळण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. पक्षातील हा वाद पुन्हा उफाळण्याची चिन्हे आहेत.
भाजप : दोन गट झाले सक्रिय
महापालिकाविरोधी पक्षनेता निवडीवरून भाजपमध्ये दोन गट पडले होते. यामध्ये स्थायी समिती सदस्य सुरेश पाटील आणि नरेंद्र काळे हे परस्पर विरोधात होते. काळे हे जुळे सोलापूर भागाचे प्रतिनिधित्व करत आहेत. विकास आराखड्याच्या भाजपच्या उपसूचनेत सुरेश पाटील यांचे नाव आल्याने काळे नाराज झाले आहेत. त्यामुळे भाजपमध्ये नाराज असलेले आठ नगरसेवक पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.
सत्ताधारी आघाडी पक्षासह विरोधी पक्षांत गट
मला माहिती नाही
जुळे सोलापूर विकास आराखड्यात पक्षाच्या सदस्यांना घेणे आवश्यक होते. या प्रकरणी आवाज उठवणे गरजेचे आहे. पक्षातील वाद असलेले मला माहीत नाही. ’’ आमदार विजयकुमार देशमुख, शहराध्यक्ष, भाजप
प्रत्येक पक्षात संघर्ष असतो
जुळे सोलापूर विकास आराखड्याचा विषय मला माहीत नाही. यावरून संघर्ष निर्माण झाला असेल तर प्रत्येक पक्षात संघर्ष असतो. माझ्यापर्यंत विषय आला नाही.’’ धर्मा भोसले, शहराध्यक्ष, काँग्रेस
दोघांची मुदत संपत आहे
विकास आराखड्याचे कामकाज दीर्घ काळ चालणार आहे. पद्माकर काळे व किशोर माडे यांची मुदत मार्चला संपत आहे. कुरेशी व मामड्याल यांची मुदत संपायला वर्ष आहे. ’’ महेश गादेकर, शहरध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस