आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फौजदारी खटले दाखल करणारच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - विसजिर्त सोलापूर जिल्हा औद्योगिक सहकारी बँकेच्या दोषी संचालकांवर फौजदारी खटले दाखल करण्यासाठी वकिलांची नियुक्ती करणार असल्याची माहिती, बँकेचे अवसायक (लिक्विडेटर) तथा जिल्हा उपनिबंधक श्रीकांत मोरे यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

बँकेतील गैरव्यवहारांची चौकशी विशेष लेखापरीक्षक दादासाहेब काळे यांनी केली. 27 फेब्रुवारी 2009 रोजी संबंधितांवर आरोप निश्चित करणारा अहवाल तयार केला. त्यावेळच्या अवसायकांकडे त्यांनी दिला होता, परंतु पुढील कारवाई झाली नाही.

ठेवीदारांना वेठीस धरणार्‍या बँकेच्या दोषी संचालकांना मोकाट सोडून बँकेची मालमत्ता मनोरमा क्रेडिट सोसायटीला भाड्याने देण्यात आल्याची तक्रार जिल्हा ठेवीदार संघाने सहकार आयुक्त मधुकर चौधरी (पुणे) यांच्याकडे केली. त्याची दखल घेऊन चौधरी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यावर स्पष्टीकरण देताना मोरे म्हणाले, ‘दोषी संचालकांवर फौजदारी कारवाई करण्यासाठी एका खासगी वकिलाची नियुक्ती केली. त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद नाही. आता दुसर्‍या वकिलाची नियुक्ती करून पुढील कारवाई करण्याचे प्रयत्न आहेत. विसर्जनानंतर बँकेत 22 कर्मचारी होते. त्यांची संख्या निम्म्यावर आणली. तरी त्यांच्या वेतनाचा प्रश्न होता. बँकेची इमारत धूळखात पडून असल्याने त्यापासून उत्पन्न मिळवण्यासाठी मनोरमा क्रेडिट सोसायटीला भाड्याने दिली. सहा महिन्यांचे भाडे आगाऊ घेतले. त्यामुळे वेतनाचा प्रश्न सुटला. भाडेतत्त्वाने दिले तरी ते काही कायमस्वरूपाचे नाही. अवसायन प्रक्रिया संपली की सोसायटीला बाहेर पडावे लागेल. तसेच बँकेचे वैकुंठभाई मेहता सभागृह इतर बँकांच्या निवडणुकीत मतमोजणीसाठी वापरून त्यापासूनही उत्पन्न मिळवून देत आहे. याचा अर्थ असा नाही, की दोषी संचालकांना सोडून दिले.’