आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur District Administration And Municipal Administration

स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी, उड्डाणपूल अडसर संपला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- बाळे येथील उड्डाणपुलाच्या ठिकाणी असलेल्या स्मशानभूमीला देण्यात येणारी पर्यायी जागा जिल्हा प्रशासनाने महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. लवकरच या जागेची हद्द निश्चित करून ती जागा स्मशानभूमीकरिता तेथील लोकांना देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे गेल्या वर्षभरापासून रखडलेले सोलापूर- पुणे महामार्गावरील बाळे उडाणपुलाचे काम मार्गी लागणार आहे. स्मशानभूमी आणि पुलाचे काम मार्गी लागेल.
बाळे येथे होत असलेल्या उड्डाणपुलाच्या ठिकाणी पूर्वी एका समाजाच्या स्मशानभूमीसाठी जागा नियोजित होती. मात्र उड्डाणपुलाच्या बांधकामामध्ये स्मशानभूमीची जागा गेली. पर्यायी जागा देण्यात प्रशासनाने बराच विलंब लावला. त्यामुळे या पुलाचे बांधकाम रखडले होती. स्मशानभूमीला पर्यायी जागा नसल्यामुळे तेथील लोक रस्त्यावरच अंत्यसंस्कार करीत होते. तसेच पुलाचे बांधकाम अर्धवट राहिल्याने अनेक अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला. या प्रकरणी १० ऑगस्ट २०१४ पासून "दिव्य मराठी'ने सातत्याने पाठपुरावा केला आहे. याची दखल घेण्यात आली आहे. लवकरच उडाणपुलाचे काम मार्गी लागणार आहे.
आता कामला विलंब नको-
स्मशानभूमीलापर्यायी जागा मिळावी म्हणून आम्ही खूप प्रयत्न केले.हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आता प्रत्यक्षात जागा ताब्यात देऊन त्याचा विकास करून द्यावा. या कामास विलंब लागल्यास आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल. राजाभाऊसरवदे, आरपीआय नेते
असा होणार विकास
स्मशानभूमीच्याजागेची हद्द निश्चित करून ती जागा त्या समाजाला देणे, स्मशानभूमीपर्यंत पोहोचण्यासाठी ३०० मीटरचा रस्ता आणि तारेचे कुंपन राष्ट्रीय महामंडळाने करून देणे, स्मशानभूमिमध्ये पाणी, दिवे, बाथरुम, अंतर्गत रस्ते आदी अनेक सुविधा महापालिका देणे आदी सर्व कामे होणार आहेत.
अशी झाली प्रक्रिया पूर्ण
मौजेसोलापूर, उत्तर सोलापूर येथील गट क्रमांक ५४३ पैकी १३ गुंठे जागा या स्मशानभूमिसाठी देण्यात आली. या जागेचे २०१५ च्या चालू बाजारमूल्याप्रमाणे १५,३७,५०० रुपयांचे चलन महापालिकेने जिल्हा प्रशासनाकडे भरले आहे. त्यानंतर ती जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली. ही प्रक्रिया फेब्रुवारी रोजी पूर्ण करण्यात आली असून, हस्तांतरित जागेचा कब्जा पावती, पंचनामा आदी कागदपत्रे देऊन सात बारा उताऱ्यावर नाव सुद्धा लावण्यात आले.
असा निघाला अडचणीतून मार्ग
बाळेयेथील एका समाजाच्या स्मशानभूमीतील २६ गुंठे जागेपैकी १३ गुंठे जागा दुसऱ्या एका समाजाच्या स्मशानभूमीला देण्याचा निर्णय तत्कालीन जिल्हाधिकारी गोकुळ मवारे यांनी घेतला. मात्र दोन समाजांमध्ये समस्या उद््भवेल, अशा शंकेमुळे तो निर्णय फाइल बंद झाला. यानंतर आयुक्त गुडेवार यांनी बाळे ओढ्यालगत असलेली आरक्षित जागा देण्याचा निर्णय घेतला. या स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी मार्ग तयार करणे आणि स्मशानभूमी पूर्णपणे विकसित करणे हे मोठे खर्चिक काम असल्यामुळे याही निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी पुढाकार घेऊन प्रश्न मार्गी लावला.

हस्तांतराची प्रक्रिया पूर्ण
पुणे महामार्गावरील बाळे येथील उड्डाणपुलाचा प्रश्न होता. या ठिकाणच्या स्मशानभूमीकरिता 13 गुंठे जागा जिल्हा प्रशासनाकडून हस्तांतरित करण्यात आली. आत्ता फक्त जिल्हा प्रशासनाने लवकर हद्द निश्चित करून द्यावी. हे काम होताच पुढील विकास कामांना सुरुवात होईल. महेशक्षीरसागर, प्रभारी सहायक संचालक नगर रचना