आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर जिल्हा 25 फेब्रुवारीपर्यंत अशांत क्षेत्र , जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांची घोषणा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - मनसेकडून बुधवारी होणार्‍या रास्ता रोको आंदोलनापूर्वीची दक्षता म्हणून जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी सोलापूर जिल्हा 25 फेब्रुवारीपर्यंत अशांत क्षेत्र घोषित केला आहे. मंगळवारी रात्री 12 वा. पासून या आदेशाची अंमलबजावणी होईल.


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज्यातील टोल नाक्याबाबत दि. 12 फेब्रुवारी रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनामुळे सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान होऊ नये तसेच सर्वसामान्य जीवनमान व वाहतूक सुरळीत चालू राहण्यासाठी कोणत्याही प्रकारची जीवित वित्तहानी होऊ नये यासाठी दि. 11 ते 25 फेब्रुवारी या कालावधीसाठी मुंबई पोलिस कायदा 1951 चे कलम 52 व 54 अन्वये जिल्हादंडाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी सोलापूर जिल्ह्यात (पोलिस आयुक्तालय हद्द वगळून) संवेदनशील व अशांत क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.