आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur District Milk Secretory Prashant Paricharak Again Join Swabhimani Saghatana

परिचारक महायुतीत; आता भालकेंच्या भूमिकेकडे लक्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या जागेवर हक्क सांगितला. त्या माध्यमातून ‘स्वाभिमानी’ने परिचारक हे आमचे संभाव्य उमेदवार असल्याचे घोषित केले आहे. महायुतीकडून याला अजूनही अधिकृत दुजोरा मिळाला नसला तरी त्यांच्या भूमिकेने आमदार भारत भालके यांच्यासह अन्य इच्छुकांची आखलेली नियोजित राजकीय गणिते बिघडली आहेत.
इच्छुकांना बदलावी लागणार राजकीय रणनीती
धनगरसमाजाचे नेते शािलवाहन कोळेकर यांनी परिचारकांचे नाव पुढे आल्याने महायुतीकडील प्रयत्न सोडून शेतकरी कामगार पक्षाकडून उमेदवारी मिळविण्याच्या कामाला लागले आहेत. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सी. पी. बागल, बाराबलुतेदार महासंघाचे प्रमुख भाई किशोर भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक आहेत. आमदार भारत भालके हे अपक्ष म्हणून मैदानात उतरल्यास राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांपैकी एकाला उमेदवारी देण्याची शक्यता आहे, तसेच परिचारक भालके या मातब्बरांपुढे तगडे आव्हान उभे करण्यासाठी उमेदवार आयात केला जाण्याचीही चिन्हे आहेत. सध्या परिचारकांच्या निर्णयामुळे इच्छुकांना आपली नियोजित राजकीय रणनीती बदलावी लागली आहे.
समाधान आवताडेही महायुतीकडून इच्छुक
यासगळ्यावर मात करत आमदार भारत भालके यांनी रविवारी मंगळवेढ्यात समर्थकांचा मेळावा घेतला. मात्र, ते ठोस भूमिका जाहीर करू शकले नाहीत. पक्षापेक्षा कार्यकर्ते लोकांचा कौल महत्त्वाचा असल्याचे सांगत त्यांच्याशी चर्चेनंतर भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगितले. मंगळवारी (दि. १६) पंढरपुरात मेळावा होईल. त्यानंतरच त्यांची निश्चित भूमिका ठरेल. त्यामुळे ते आघाडीकडून की अपक्ष म्हणून मैदानात उतरणार, हे कोडे अद्याप सुटले नाही. दरम्यान, महायुतीचे जागावाटपही जाहीर झाल्याने शिवसेनेकडून मलाच उमेदवारी मिळणार असल्याचा विश्वास समाधान आवताडे व्यक्त करत आहेत. महायुतीकडून परिचारकांना संधी मिळाल्यास आवताडे काय भूमिका घेणार, याविषयीही उत्सुकता आहे.

पक्षप्रवेशाचा निर्णय घेण्यात भालकेंकडून होतोय विलंब
यामतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी आमदार भालके परिचारक यांनी गेल्या दोन-अडीच वर्षांपासून मोर्चेबांधणीला सुरुवात केली. काँग्रेसचे सहयोगी सदस्य असलेल्या भालके हे मंगळवेढ्यातील ३५ गावांचा पाणीप्रश्न काँग्रेस आघाडीने मार्गी लावल्यामुळे ते या वेळची निवडणूक काँग्रेसकडूनच लढवतील, असा अंदाज बांधला जात होता. चारच दिवसांपूर्वी राज्यातील काही नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यात भालके यांचाही समावेश असल्याचे बातम्या वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झाल्या. मात्र, त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला नाही. काँग्रेस आघाडी विरोधातील नाराजी आणि लोकसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेले यश याचा विचार करून त्यांनी शिवसेनेकडून उमेदवारी मिळविण्यासाठी सेना नेत्यांच्या मार्फत प्रयत्न केले. परंतु परिचारक यांच्या निर्णयाने त्याला खीळ बसल्याची चर्चा आहे. भालके परिचारक