आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसे जिल्हाध्यक्ष महिंद्रकर यांचे निधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष भूषण महिंद्रकर (वय ३३) यांचे प्रदीर्घ आजाराने बुधवारी सकाळी निधन झाले. यांच्या पार्थिवावर सायंकाळी बाळे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ते २००७ पासून राजकारणात आणि समाजकारणात सक्रिय होते. राज ठाकरे यांच्या वक्तृत्वाने प्रभावित होऊन त्यांनी मनसेत प्रवेश घेतला होता.
महिंद्रकर यांचे संघटन कौशल्य पाहून पक्षाने त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे सोपविली होती. जिल्हा संघटक बापू धोत्रे यांच्या जोडीने पक्ष संघटन केले. शहराच्या अनेक मुद्यांवर त्यांनी पुढाकार घेऊन अनेक आंदोलने केली होती. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, भाऊ, बहीण असा परिवार आहे.
बातम्या आणखी आहेत...