आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापूर: डीपीसी’साठी 93 टक्के मतदान,उद्या मतमोजणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी गुरुवारी 93.68 टक्के मतदान झाले. जिल्हा परिषदेच्या सर्व 68 सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. महापालिकेच्या 102 पैकी 92 आणि नगरपालिकेच्या 193 पैकी 181 जणांनीच मतदान केले. शनिवारी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात मतमोजणी होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अशोक काकडे यांनी ही माहिती दिली.

समितीवर स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी निवडून जाणार आहेत. जिल्हा परिषदेतून 27, महापालिकेतून 9 आणि नगरपालिकेतून 4 असे एकूण चाळीस सदस्य आहेत. दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयात जिल्हा परिषद सदस्यांनी, उत्तर तहसील कार्यालयात महापालिकेच्या नगरसेवकांनी मतदान केले. अक्कलकोट, दुधनी, मैंदगी, बार्शी नगरपालिका सदस्यांनी सोलापूर प्रांत कार्यालयात मतदान केले. करमाळा, कुडरुवाडी, माढा नगरपालिकेतील सदस्यांनी कुडरुवाडी प्रांत कार्यालयात आणि पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला नगरपालिका सदस्यांनी पंढरपूर प्रांत कार्यालयात मतदान केले. सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरवात झाली. सकाळी 8 ते 10 यावेळेत सर्व मिळून फक्त 32 सदस्यांचे मतदान झाले होते. दुपारी चार वाजेपर्यंत 341 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. दुपारी 12 वाजल्यापासून मतदारांनी गर्दी केली होती. लग्नाची तिथी असल्याने लग्नाला हजेरी लावून अनेकजण मतदानाला आले होते. पसंतीक्रमानुसार मतदान प्रक्रिया होती.

माकप, बसप तटस्थ : मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या सहा नगरसेवकांनी मतदान केले नाही. या पक्षांचे नगरसेवक आनंद चंदनशिवे, सुनंदा बल्ला, माशप्पा विटे, सुनीता भोसले, उषा शिंदे, महादेवी अलकुंटे तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. काँग्रेसचे नगरसेवक पैगंबर शेख, रफिक हत्तुरे, र्शीदेवी फुलारे यांना मतदानात भाग घेता आला नाही. र्शी. शेख शहराबाहेर, र्शी. हत्तुरे रुग्णालयात आणि फुलारे अटकेत आहेत. खून प्रकरणात भारतीय जनता पक्षाचे अनंत जाधव यांना शिक्षा झाली असून फरार आहेत.

<ऊ्र58ं टं1ं3ँ्र>आरिफ शेख, देवेंद्र भंडारेंचा निकाल लांबणीवर :<ऊ्र58ं टं1ं3ँ्र>काँग्रेसचे नगरसेवक आरिफ शेख व देवेंद्र भंडारे यांच्या अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी झाली. जिल्हाधिकार्‍यांच्या अर्ज रद्द करण्याच्या निर्णयास दिलेली स्थगिती कायम ठेवत खटला दाखल करून घेण्यात आला. त्यामुळे न्यायालयाचा निकाल हातात पडल्यावरच शेख व भंडारे यांच्यात शनिवारी होणार्‍या मतमोजणी निकालासंदर्भात निर्णय होणार आहे. खुल्या वर्गातून निवडून येत समितीच्या राखीव जागेसाठी अर्ज केल्याने त्यास भाजप-शिवसेनेने हरकत घेतली होती. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी हरकत फेटाळली होती. जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेल्या अपिलातील सुनावणीत निवडणूक निर्णय अधिकारी यांचा निर्णय फिरवून भाजप-शिवसेनेची हरकत मंजूर केली होती. या निर्णयाविरोधात शेख व भंडारे यांनी न्यायालयात अपील केले होते.