आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर जिल्हा परिषदेतून कमल कमळे बिनविरोध

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झाली आहे. माजी महापौर अरिफ शेख यांचा अर्ज रद्द झाला आहे. त्या जागेसाठी अर्ज नसल्याने ती जागा रिक्त राहिली आहे. महापालिकेतील नगरसेवक महेश कोठे, सुरेश पाटील, रार्जशी कनकी, अश्विनी जाधव, नरसूबाई गदवालकर आणि जिल्हा परिषद सदस्या कमल कमळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

समितीच्या 40 जागांवर लोकप्रतिनिधी निवडून जाणार आहेत. 33 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी 86 जणांचे अर्ज आले आहेत. मंगळवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. त्यामुळे उद्या चित्र स्पष्ट होईल. जिल्हा परिषदेतून 27, महापालिकेतून 9 आणि नगरपालिकांतून 4 असे एकूण चाळीस सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. काँग्रेसचे नगरसेवक देवेंद्र भंडारे यांचा अर्ज रद्द झाल्यामुळे भाजपच्या नगरसेविका नरसूबाई गदवालकर बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर र्शी. शेख यांच्या अर्ज बाद झाला. मात्र, त्या जागेसाठी दुसरा अर्ज नसल्याने ती जागा रिक्त राहिली आहे.

बिनविरोध निवड
खुला प्रवर्ग : महेश कोठे (कॉंग्रेस), सुरेश पाटील (भाजप)
ओबीसी महिला : राजश्री कणके (शिवसेना), अश्विनी जाधव (कॉग्रेस)
अनुसूचित जाती: नरसूबाई गदवालकर (भाजप)

स्थगितीबाबत वकिलांचे पत्र
छाननीमध्ये अर्ज मंजूर झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याकडील अपिलात अर्ज रद्द झाले. त्यामुळे अरिफ शेख व देवेंद्र भंडारे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार उच्च न्यायालयात जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाला स्थगिती मिळाली असल्याच्या माहितीचे पत्र जिल्हाधिकारी यांना दिले असल्याची माहिती अँड. ध्रुपद एस. पाटील यांनी दिली.