आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरसह विभागातील 9 स्टेशनला ‘मॉडेल’चा दर्जा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील 9 स्थानकांना रेल्वे बोर्डाने ( दिल्ली) मॉडेल रेल्वे स्थानकांचा दर्जा दिला आहे. यामध्ये सोलापूरसह पंढरपूर, कुर्डवाडी अशा प्रमुख स्थानकांचा समावेश आहे. मॉडेल रेल्वे स्थानकाचा दर्जा मिळाल्यामुळे प्रवाशांच्या सुविधेत वाढ होणार आहे. पिण्याच्या पाण्यापासून ते सरकत्या जिन्यांचा समावेश असणार आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार विभागातील रेल्वे स्थानकाचा बारकाईने अभ्यास होतो. पाच वर्षांत कोणत्या स्थानकावरून किती प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून मिळणार्‍या उत्पन्नाचा यात प्रामुख्याने विचार केला जातो. यातून रेल्वे बोर्ड स्थानकांचा दर्जा ठरतो. मॉडेल रेल्वे स्थानकांमध्ये ए- 1, ए व बी स्थानकाच्या दर्जा असलेल्या रेल्वे स्थानकांचा समावेश होतो.

या स्थानकांना मिळाला मॉडेलचा दर्जा :
सोलापूर, गुलबर्गा, कुर्डुवाडी, दौंड, अहमदनगर, कोपरगाव, साईनगर शिर्डी, पंढरपूर, वाडी या स्थानकांना त्यांच्या दर्जानुसार रेल्वे बोर्डाने मॉडेल स्थानकाचा दर्जा दिलेला आहे. यातील सोलापूर ए-1, पंढरपूर व वाडी - बी, तर उर्वरित स्थानके ए दर्जाची आहेत. यामुळे सोलापूर विभागाच्या विकासाला चालना मिळेल.