आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डीपीसी निवडणूक, आज होणार मतदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- जिल्हा नियोजन समिती निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान होणार आहे. भाजप-सेनेच्या हरकतीवर न्यायालयात गेलेले नगरसेवक आरिफ शेख व देवेंद्र भंडारे यांच्या अपिलावर मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी होणार आहे. मतमोजणी शनिवारी होणार आहे.

जिल्हा परिषदेतून 27, महापालिकेतून 9 आणि नगर पालिकांतून 4 असे 40 सदस्य जिल्हा नियोजन समितीवर निवडून द्यावयाचे आहेत. त्यासाठी गुरुवारी सकाळी 8 वाजल्यापासून मतदान होणार आहे. जिल्हा परिषदेसाठी दक्षिण सोलापूर तहसील आणि महापालिकेतील मतदारांसाठी उत्तर सोलापूर तहसील कार्यालयात मतदान होणार आहे. नऊ नगरपालिकांसाठी सोलापूर, पंढरपूर आणि कुडरुवाडी प्रांत कार्यालयात मतदान होणार आहे. प्रत्येक केंद्रावर एका अधिकार्‍यासह पाच कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. 16 फेब्रुवारीला मतमोजणी आहे.

<ऊ्र58ं टं1ं3ँ्र>भवितव्य आज ठरणार

<ऊ्र58ं टं1ं3ँ्र>काँग्रेसचे नगरसेवक आरिफ शेख व देवेंद्र भंडारे यांच्या अर्जावर छाननीमध्ये भाजप-सेनेच्या वतीने हरकत घेण्यात आली होती. निवडणूक निर्णय अधिकारी अशोक काकडे यांनी हरकत फेटाळली. त्यावर भाजप-सेनेने जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे अपिल केले. अपिलात भाजप-सेनेची हरकत मान्य करण्यात आली. त्यावर काँग्रेसचे नगरसेवक न्यायालयात गेले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार शेख व भंडारे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरता आले आहे. गुरुवारी त्यांना मतदानही होणार आहे. तर न्यायालयाचीही सुनावणी गुरुवारीच आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निकालावर शेख व भंडारे यांच्या निवडणूक निकालाचे भवितव्य आहे. निकाल लागला तर न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई होईल आणि निकाल न लागल्यास मतदानाचा निर्णय राखून ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. महापौर अलका राठोड यांचे दोन्ही अर्ज रद्द झाले. सही नसल्याने त्यांचा पहिला अर्ज बाद झाला होता. तर दुसरा अर्ज त्यांनी खुल्या वर्गातून निवडून येत समितीच्या राखीव जागेसाठी अर्ज केला होता.