आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Election Campaign Issue For Candidate Kothe

सोलापूर ‘उत्तर’मध्ये सगळ्यांसमोर पेच;कोठे समर्थक काँग्रेस नगरसेवकांची झाली गोची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात महेश कोठे यांचा मोठा प्रभाव आहे. काँग्रेसचे नगरसेवक त्यांचे समर्थक समजले जातात. परंतु, त्यांना सोडून कोठे शिवसेनेत गेल्याने या समर्थकांची गोची झाली. काँग्रेसचे उमेदवार विश्वनाथ चाकोते यांच्यासोबत प्रचारात सहभाग नाही. आतून कमळ म्हणायचे की, धनुष्यबाण. काही ठरलेले नाही. अपक्ष उमेदवार दत्तोबा बंदपट्टे तेवढे चाकोते यांच्या दिमतीला असल्याचे दिसून येतात.
कोठे समर्थक नगरसेवकांमध्ये कुमुद अंकारम यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला. त्या कोठेंच्या चुलत भगिनी. परंतु चाकोते यांचे पुतणे उदयशंकर यांच्यासोबत त्या निवडून आल्या. त्यामुळे त्यांना पक्षासोबत जाणे भाग आहे. परंतु त्यांचा प्रत्यक्ष सहभाग नाही. त्यांचे पती भीमाशंकर अंकारम मात्र चाकोते यांच्यासोबत असल्याचे दिसून येते. तशीच अवस्था नगरसेविका निर्मला नल्ला यांचीही. त्याही कोठे यांच्या नातलग. विडी घरकुलच्या नगरसेविका श्रुती मेरगू, विठ्ठल कोटा ही मंडळी म्हणजे कोठेंचे कट्टर समर्थक. त्यांच्या पुढेही प्रश्न आहे, की प्रचार करायचा कुणाचा?

श्री. चाकोते विशिष्ट भागापुरतेच मर्यादित आहेत. बोरामणी नाक्याच्या पुढे त्यांची धाव नाही. गवई पेठ, २५६ गाळा, गोंधळी वस्ती, विडी घरकुल या भागात त्यांचा वावर नसतो. तेथील नगरसेवकांच्या मदतीने प्रचार करणे अपेक्षित असताना कोठे समर्थक नगरसेवकांची अशी अवस्था. त्यामुळे प्रचारात पुतणे उदयशंकर आणि श्री. बंदपट्टे अशा दोन नगरसेवकांच्या मदतीने त्यांचा प्रचार सुरू आहे. पदयात्रा निघाल्या की, यात्रेतीलच काही मंडळी फटाक्यांची माळ लावतात. वाद्यांचा जोरदार आवाज असतो.