आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाध्यक्षपदाच्या शर्यतीत डोंगरेच पुढे, २० तर २५ एप्रिलला होणार निवड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - नवीन जिल्हाध्यक्ष निवड बैठकीत राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून आजपर्यंत जिल्हाध्यक्षपदी असलेले मनोहर डोंगरे यांचे नाव पुढे येत आहे. डोंगरे यांच्याशिवाय इतर पाच जणांचे नाव समोर आले आहे. जिल्हाध्यक्ष निवडण्याचा अधिकार श्रेष्ठींना असल्याने याबाबत अंतिम निर्णय अजित पवार घेणार आहेत. ही निवड २० एप्रिलपर्यंत जाहीर करण्यात येईल, अशी माहिती पक्ष निरीक्षक अंकुशराव काकडे यांनी सांगितली.

जिल्हाध्यक्ष निवडीबाबत पक्ष निरीक्षक अंकुश काकडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आमदार दिलीप सोपल, आमदार बबनराव शिंदे, दीपक साळुंखे पाटील, जि. प. अध्यक्षा जयमाला गायकवाड, माजी आमदार राजन पाटील, बळीराम साठे, बाळासाहेब शेळके आदी उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे यांनी केले.
जिल्हा अध्यक्ष कोण असावा, या विषयी मत व्यक्त करताना पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळी मते व्यक्त केली. जिल्हा उपाध्यक्ष अरुण कापसे म्हणाले, "पक्ष स्थापन झाल्यापासून एकाच व्यक्तीकडे जिल्हाध्यक्ष पद आहे, नवीन लोकांना संधी द्या, त्यांनी योग्य काम केले नाही तर इतरांना द्या. संधीच देत नाही तर काम करणार की नाही, हे कसे कळणार. जिल्हाध्यक्ष पदासाठी मी इच्छुक आहे.'

अख्तरताज पाटील भोजराज पवार यांनी मनोहर डोंगरे यांनाच पुन्हा संधी द्यावी. ते तयार नसतील तर बळीराम साठे यांना संधी देण्याची मागणी केली. सांगोला तालुकाध्यक्ष तानाजी पाटील यांनी मनोहर डोंगरे यांंना नकार िदला तर आमदार दीपक साळुंखे-पाटील यांना जिल्हाध्यक्ष करण्याची मागणी केली.

बार्शीचे तालुकाध्यक्ष नंदकुमार काशीद यांनी डोंगरे यांना संधी द्यावी, अशी मागणी केली. डोंगरे यांच्याकडून नकार असेल तर जिल्हा उपाध्यक्ष अरुण कापसे यांची निवड करण्याची मागणी केली. दिलीप सिद्धे यांनी डोंगरे यांना जिल्हाध्यक्ष पद देण्ाची मागणी केली. अल्पसंख्यक जिल्हाध्यक्ष अॅड. वजीर शेख यांनी खासदार मोहिते यांचा सल्ला घेऊन जिल्हाध्यक्षांची निवड करण्याची मागणी केली.
जिल्हाध्यक्ष निवडीबाबत पक्ष निरीक्षक अंकुश काकडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे, आमदार दिलीप सोपल, आमदार बबनराव शिंदे, आमदार दीपक साळुंखे, बाळासाहेब शेळके आदी.

काँग्रेसपेक्षा आपली स्थिती चांगली - काकडे
पदाधिकारीकार्यकर्त्यांच्या बाबतीत काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची स्थिती चांगली आहे. पक्षाकडील विविध संघटनेचे पदाधिकारी आज चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. काँग्रेसचे पदाधिकारी चुकीची विधाने करून पक्षाला अडचणीत आणत आहेत. राष्ट्रवादीच्या बाबतीत तशी स्थिती नसल्याचे पक्ष निरीक्षक काकडे यांनी स्पष्ट केले.

सत्ता गेली आहे, आता तरी जमिनीवर या...
गेली१५ वर्षे राष्ट्रवादी सत्तेवर असल्याने आजही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमिनीवर येण्यास तयार नाहीत. शासनाकडून घेण्यात आलेल्या चुकीच्या धोरणांवर कोणीही आंदोलन करत नाही, हे वास्तव आहे. यामुळे आज राष्ट्रवादी विरोधी पक्ष असल्याने काम करण्याची मोठी संधी आहे. मात्र, तरीही कार्यकर्ते जमिनीवर येण्यास तयार नाहीत.