आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुनानक चौकात अतिक्रमण काढण्यावरून गोंधळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- गुरुनानकनगर चौकातील खाद्यपदार्थांच्या गाड्यांचे अतिक्रमण काढण्यासाठी गेलेले जिल्हा परिषदेतील महसूल विभागाचे पथक माघारी फिरले.

विक्रेत्यांनी व आजी-माजी नगरसेवकांनी विरोध केला. त्यामुळे तेथे तणावाची स्थिती निर्माण झाली. स्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे असल्याने पथक माघारी फिरले, अशी माहिती तहसीलदार अंजली मरोड यांनी दिली. विक्रेत्यांनी माजी नगरसेविका नलिनी कलबुर्गी, राजकीय कार्यकर्ते शौकत पठाण यांना फोन करून बोलावून घेतले. ते काही कार्यकर्त्यांसह तेथे आले. अतिक्रमण काढणार्‍या पथकास जोरदार विरोध केला. कर्मचारी व कार्यकर्ते यांच्यातील विरोधामुळे तणाव निर्माण झाला. त्यामुळे पथकाने पोलिसांना बोलावून घेतले. मात्र, पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली.

पालकमंत्र्यांना कळवले
गुरुनानक चौकातील जागा महसूल विभागाची आहे. तेथे धर्मादाय आयुक्त कार्यालयाची इमारत बांधण्यात येणार आहे. तेथील अतिक्रमण हटविण्यास लोकांनी विरोध केला. तणाव निर्माण झाल्याने परतलो. पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे यांना माहिती दिली.’’ अंजली मरोड, तहसीलदार, उत्तर सोलापूर

जागा केंद्राची
गुरुनानक नगरातील जागा केंद्र शासनाची आहे. खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी पर्यायी जागा नसल्याने विरोध केला. महसूल विभागाचे कर्मचारी जबरदस्ती करत नुकसान करण्याबरोबर आर्थिक शोषण करत असल्यामुळे गोंधळ झाला.’’ शौकत पठाण, राजकीय कार्यकर्ता