आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वसंत पवारांच्या हल्लेखोरांवर कटाचा, खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा लावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- महापालिकेचे आवेक्षक वसंत पवार यांच्यावर हल्ला करणार्‍यांविरुद्ध कट रचून खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी, महापालिका कामगार संघटना कृती समितीच्या मोर्चात करण्यात आली.(अतिक्रमणविरोधी अधिकार्‍यावर जीवघेणा हल्ला) हल्ल्याचा निषेध करण्यासाठी समितीच्या वतीने सर्व कामगार संघटनांचा सोमवारी मोर्चा काढण्यात आला.

हल्लाप्रकरणी दोघांना अटक झाली आहे. त्यांच्यावर किरकोळ मारहाण गुन्ह्यातील कलम लावण्यात आले आहे. प्रमुख सूत्रधार व अन्य आरोपींना अटक झाली नाही. त्यांचा शोध घेऊन अटक करा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. महापालिका कर्मचारी, अधिकार्‍यांना संरक्षण देण्याचीही मागणी झाली. याचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांना देण्यात आले.

जुळे सोलापुरातील डी-मार्टजवळ चायनीज पदार्थविक्रेत्यांच्या बेकायदा गाड्या हटवत असताना पवार यांच्यावर शनिवारी जीवघेणा हल्ला झाला होता. त्यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. आश्विनी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

डॉ. आंबेडकर चौकातून मोर्चास सुरुवात झाली. मेकॅनिक चौक, नवी पेठ, दत्त चौक, माणिक चौक ते विजापूर वेस मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आला. त्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले.
पठाण, डॉ. शहाजी गायकवाड, सरिता अकुलवार, अवताडे, विजय कांबळे, सिध्दप्पा कलशेट्टी यांच्यासह सुमारे दोन हजार कामगार सहभागी झाले होते.

अतिक्रमणविरोधी मोहिमेदरम्यान महापालिका आवेक्षक वसंत पवार यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधात महापालिका कर्मचारी संघटना कृती समितीने सोमवारी मोर्चा काढला. त्यात सर्व कर्मचारी, अधिकारी सामील झाले होते.

संघटनेच्या प्रमुख मागण्या
>मुख्य सूत्रधार शोधून त्यांच्यावर कलम 120 ब अन्वये तातडीने गुन्हा दाखल करा
>अतिक्रमण विभागातील कर्मचार्‍यांना सरंक्षणाची साधने द्या
> अटकेतील आरोपींना 307 कलम लावा
>बघ्याची भूमिका घेणार्‍या पोलिसांना निलंबित करा
>अन्य आरोपींना तातडीने अटक करा

मारेकर्‍यांना मोक्का लावा

.. तर कामबंद आंदोलन
हल्लेखोरांवर भारतीय दंड विधानप्रमाणे 307 कलम लावा आणि मुख्य सूत्रधारास अटक करा. अन्यथा महापालिका कामगार कामबंद आंदोलन करतील. आपल्याकडे हेच हत्यार आहे. त्यानंतर अनारोग्य, कायदा व सुव्यवस्था निर्माण झाल्यास कर्मचारी जबाबदार राहणार नाहीत.
- अशोक जानराव, अध्यक्ष, मनपा कामगार कृती समिती

सध्या लावलेली कलमे
353 : शासकीय कामात अडथळा, धक्काबुक्की करणे, 326 : मारहाण करणे, 333 : कामात अडवणूक करणे, 323 : किरकोळ मारहाण, 504 : शांतता भंग करून, चिथावणी देणे, 506 : जिवे मारण्याची धमकी, 34 : संगनमत करणे

नेतेही झाले सामील
सभेत नगरसेवक जगदीश पाटील, महापालिकेचे अधिकारी मोहन कांबळे, दीपक दोड्यानूर, कामगार नेते अशोक जानराव, र्शीशैल गायकवाड आदींनी मनोगत व्यक्त करत घटनेचा निषेध केला.

दोन हजार कर्मचारी
उपअभियंता दीपक भादुले, विजय राठोड, गंगाधर दुलंगे, संदीप कारंजे, नगर सचिव ए. ए. पठाण, डॉ. शहाजी गायकवाड, सरिता अकुलवार, अवताडे, विजय कांबळे, सिध्दप्पा कलशेट्टी यांच्यासह सुमारे दोन हजार कामगार सहभागी झाले होते.