आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापुरातील राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळेना कारवाईचा मुहूर्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शहरात रासायनिक ताडी राजरोसपणे विकली जात आहे. ही बाबत निदर्शनास आणूनसुद्धा कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाला मुहूर्त मिळत नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
‘दिव्य मराठी’ने (28 ऑगस्ट) याचे वृत्त दिले होते. रासायनिक ताडी ही ‘क्लोरल हायड्रेट’ हे विषारी द्रव्य मिसळून तयार करण्यात येत असल्यामुळे हे पिण्यासाठी अपायकारक आहे. या ताडी विक्रीवर नियंत्रण आणणे अत्यावश्यक असताना सध्या सोलापॅरात ही ताडी जागोजागी विकली जात आहे. ही ताडी स्वस्त विकली जात असल्यामुळे आरोग्याची तमा न बाळगता ताडी पिण्यार्‍या शौकिनांची गर्दी वाढतच चालली आहे.

‘दिव्य मराठी’स 27 ऑगस्ट रोजी दुपारी रासायनिक ताडीच्या विक्री ठिकाणांची माहिती आणि फोटो घेत असल्याची माहिती काही पोलिसांना मिळाली. यानंतर 27 ऑगस्ट आणि 28 ऑगस्ट रोजी खुलेआम पद्धतीने विक्री होत असलेली ताडी चोरी चुपके विकण्यात आली. तसेच 27 ऑगस्ट रोजी रात्री एमआयडीसी पोलिसांनी विडी घरकुल परिसरातून पाच लिटर रासायनिक ताडी जप्त केली.

लवकरच कारवाई
रासायनिक ताडी विकणार्‍यांवर बुधवारी काही कारवाई करण्यात आली नाही. लवकरच कारवाई हाती घेऊ आणि प्रसिद्धी माध्यमाच्या प्रतिनिधींना कळवू.’’ -संध्याराणी देशमुख, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क