आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Farmer Is Responcible For Food And Supply

अन्न, रोजगार पुरवणारा शेतकरीच खरा निराधार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - देशात 12 कोटी शेतकरी आहेत. शेतीच्या माध्यमातून 22 कोटी लोकांचा रोजगार चालतो. एवढे देऊनही प्रत्यक्ष शेती करणारा निराधारच असतो. त्याने उत्पादित केलेल्या मालाला हमीभाव नाही, पेन्शन नाही. तोच असुरक्षित राहिला तर देशवासीयांना अन्न पुरवणार कोण? असा प्रश्न प्रसिद्ध कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी येथे केला.

वि. गु. शिवदारे प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. वैद्यकीय क्षेत्रातील कामगिरीबद्दल कर्करोगतज्ज्ञ डॉ. बी. एस. बिराजदार, एचआयव्ही बाधित मुलांसाठी कार्य करणार्‍या श्रीमती मंगल शहा (पंढरपूर) आणि सीताफळ पिकवण्यात अभिनव प्रयोग करणारे नवनाथ कसपटे यांना पुरस्कार देण्यात आला.
डॉ. मुळीक म्हणाले, ‘लोकसंख्या वाढतच आहे. त्यांना अन्न, पाणी व वैद्यकीय सुविधा या गरजेच्या गोष्टी मिळण्यासाठी उपाय होतील. त्यात शेतकरी सुरक्षित करण्याचे काम मोठे आहे. कारण असुरक्षिततेमुळे शेती करणार्‍यांची संख्या घटू लागली. रोजगार हमीवर काम परवडले; पण शेती नको, इथंपर्यंतची मानसिकता होत आहे. शेती करणार्‍याला मुलगी देत नाहीत. नोकरदाराला लगेच मिळते. शेतीसंदर्भात दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे.’

प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष श्रीशैल वाले यांनी स्वागत केले. सचिव गणेश वाघोले यांनी आभार मानले.
पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे मनोगत
सीताफळ या दुर्लक्षित फळपिकाकडे मुद्दाम लक्ष वेधले. 36 एकरात विविध जातींच्या सीताफळांची लागवड केली. रोपवाटिका तयार केली. त्याच्या विक्रीचे नियोजन असते. म्हणून तर चांगला दर मिळतो.’’
नवनाथ कसपटे, सीताफळ उत्पादक

वाढत्या कर्करुग्णांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. रुग्णांना समुपदेशनाची मोठी गरज असते. अशा दोन्ही बाजू सांभाळून वैद्यकीय सेवा देणे ही काळाची गरज बनली.’’
डॉ. बी. एस. बिराजदार, कर्करोगतज्ज्ञ
एकनिष्ठ राहून काही गोष्टी पाळल्या तर सामाजिक स्वास्थ्य चांगले राहील. अन्यथा आपण केलेल्या चुकांची शिक्षा आपली मुले भोगतील, ही भावना सदैव मनात ठेवावी.’’
मंगल शहा, सामाजिक कार्यकर्त्या