आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकर्‍यांनो, खाते क्रमांक न दिल्यास अनुदान जाईल परत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - जिल्ह्यातील दुष्काळी भागातील शेतकर्‍यांना मदतनिधी म्हणून शासनाने 50 पैशांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या सात तालुक्यांतील 476 गावांना 101 कोटी 40 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. यापैकी 82 कोटी 68 लाख रुपयांचे वाटप झाले. काही शेतकर्‍यांनी बँक खाते क्रमांक न दिल्याने सुमारे 18 कोटी 71 लाख रुपयांचे वितरण रखडले आहे. 20 फेब्रुवारीपर्यंत खाते क्रमांक न कळवल्यास शासनास अनुदान पाठवले जाणार आहे.

सन 2011-12 मध्ये रब्बी हंगामातील पीक दुष्काळामुळे वाया गेल्याने शेतकर्‍यांना शासनाने नुकसानभरपाई म्हणून दोन हेक्टरपर्यंत हेक्टरी दोन हजार पाचशे रुपयांची मदत देऊ केली. गावनिहाय शेतकर्‍यांची यादी तयार होण्यास तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागला. यामध्ये पहिल्या टप्प्यात 89 कोटी 36 लाख रुपयांचा निधी मिळाला होता, त्यानंतर दुसर्‍या टप्प्यात उर्वरित 12 कोटी 4 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. ज्यांनी तलाठी वा तहसील कार्यालयात आजपर्यंत खाते क्रमांक दिले नाहीत, त्यांना 20 फेब्रुवारीपर्यंत खाते क्रमांक जमा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. गेडाम यांनी केले आहे.

..तर निधी सर्मपित होईल
दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मदत म्हणून मिळालेल्या रकमेचे गेल्या 8 महिन्यांपासून वाटप सुरू आहे. 81 टक्के शेतकर्‍यांना वाटप झाले आहे. उर्वरित शेतकर्‍यांनी 20 फेब्रुवारीपर्यंत खाते क्रमांक न दिल्यास ही रक्कम शासनास सर्मपित करण्यात येणार आहे. डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी

तालुकानिहाय उपलब्ध अनुदान व वितरण
तालुका प्राप्त अनुदान रक्कम वाटप रक्कम शिल्लक रक्कम
द.सोलापूर 06 कोटी 99 लाख 05कोटी 39 लाख 59 लाख 31 हजार
माढा 18 कोटी 47 लाख 15 कोटी 43 लाख 3 कोटी 3 लाख
मोहोळ 17 कोटी 28 लाख 13 कोटी 67 लाख 3 कोटी 61 लाख
करमाळा 18 कोटी 27 लाख 16 कोटी 37 लाख 1 कोटी 89 लाख
मंगळवेढा 17 कोटी 61 लाख 12 कोटी 45 लाख 5 कोटी 15 लाख
सांगोला 21 कोटी 91 लाख 18 कोटी 53 लाख 3 कोटी 38 लाख
माळशिरस 85 लाख 83 हजार 82 लाख 67 हजार 3 लाख 16 हजार