आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरमध्ये वर्षात 250 दिवस पोलिस बंदोबस्तात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - ‘सदरक्षणाय खल निग्रहणाय’ असे ब्रीद असलेल्या सोलापुरातील पोलिसांचा सर्वाधिक वेळ बंदोबस्तातच जातो. जयंती उत्सव, जिल्हाधिकारी, महापालिका कार्यालयावर मोर्चा, धरणे, आंदोलन, आमरण उपोषण, संघर्ष मेळावा, रॅली, ठिय्या आंदोलन, व्हीआयपी दौरा याची आकडेवारी पाहिली की, पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण किती मोठा आहे याची प्रचीती येते. 365 दिवसांपैकी 250 हून अधिक दिवस बंदोबस्त ठरलेला असतो. जयंती-उत्सव मिरवणुकीचा बंदोबस्त वेगळाच आहे. त्यामुळे तपास कामावर परिणाम होत आहे.

तपासावर परिणाम विशेषत : बंदोबस्ताचा ताण सदर बझार पोलिसांवर (जिल्हाधिकारी, महापालिका कार्यालय, डाक बंगला, रेल्वे स्टेशन, व्हीआयपी बंदोबस्त) आहे. त्यानंतर फौजदार चावडी (शिवाजी चौक, चार पुतळा येथून मोर्चा सुरुवात), विजापूर नाका, एमआयडीसी (विमानतळ बंदोबस्त). यामुळे पोलिसांच्या कामावर परिणाम होतोच. बारा तासांहून अधिक वेळ बंदोबस्तात जातो. गुन्ह्याच्या तपासासाठी वेळ मिळत नाही. विशेष शाखा, वाहतूक शाखेलाही याचा ताण आहे. बंदोबस्तातच पोलिस गुंतल्याने शहरात घडलेल्या गुन्हांचा तपास रखडत आहे.

उत्सवाचे शहर

येथे विविध समाज जाती-धर्माचे लोक वास्तव्यास आहेत. शिवजयंती, बसवजंयती, डॉ. आंबेडकर जयंती, सिद्धेश्वर यात्रा, नवरात्र, गणपती बंदोबस्त याशिवाय विविध महापुरुष यांच्या जयंती उत्सवाचा बंदोबस्त असतो राज्यातील अन्य शहराच्या तुलनेत सोलापुरातील उत्सव मोठे आहेत. नव्हेतर सर्वाधिकीपणे साजरे होतात. असे पोलिस अधिकारी खासगीत बोलताना सांगतात. याशिवाय मोर्चा, मेळावा, बेमुदत व्यापार बंद, जेल भरो आंदोलन, ठिय्या अंदोलन, आत्मदहन, उपोषण या घटनांचा बंदोबस्त वेगळाच.

मोर्चा, आंदोलन एकाच ठिकाणी केल्यास पोलिसांना मोठा बंदोबस्ताचा ताण राहणार नाही. सण, उत्सव पोलिस बंदोबस्त विरहीत व्हावा. ही संकल्पना नागरिकांनी अमलात आणल्यास नक्कीच बदल दिसतील. त्यासाठी पोलिसांना सहकार्य हवे. प्रदीप रासकर, पोलिस आयुक्त

मोर्चा, रॅली, कार्यक्रम घेतल्यास पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताणही कमी होईल. वाहतूकही जॅम होणार नाही. रस्त्यावर गर्दीही होणार नाही. यासाठी सर्वांनीच सकारात्मक भूमिका घ्यावी. तरच हा बदल होऊ शकेल. सुभाष बुरसे, पोलिस उपायुक्त