आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२४४ आगीच्या घटना १२ कोटींचे नुकसान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मागीलवर्षात शहरात २३२ तर शहराबाहेर १४ अशा २४४ ठिकाणी आग लागण्याची घटना घडली. यात सुमारे १२.८० कोटींचे नुकसान झाले आहे. अशा घटना घडू नये यासाठी १४ ते २० एप्रिल कालावधीत जनजागृती करून अग्निशमन सेवा सप्ताह पाळण्यात येतो. सप्ताहाची सुरुवात मंगळवारपासून झाली. साखर पेठ येथे प्रात्यक्षिक सादर करून आगीपासून संरक्षण कसे करावे याबाबत माहिती देण्यात आली.

अग्निशमन सेवा सप्ताहाचा प्रारंभ महापौर सुशीला आबुटे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी मनपा आयुक्त विजयकुमार काळम-पाटील, उपायुक्त श्रीकांत म्याकलवार, सहायक अायुक्त अमिता दगडे-पाटील, नगरसेवक आनंद चंदनशिवे आदी उपस्थित होते. अग्निशमन दलाचे प्रमुख केदार आवटे यांनी सर्वांचे स्वागत केले. आगीपासून होणारे नुकसान भरून येत नाही. शहरातील ८० टक्के मालमत्तेचा विमा नसतो. त्यामुळे आगीतून नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे आगीपासून संरक्षण मिळवण्याबाबत अग्निशमन सेवा सप्ताहात जनजागृती उपक्रम राबवण्यात येतो. अग्निशामक दला दोन वाहन दाखल करण्यात आली आहे. यामुळे सेवा आणखी गतिमान होणार आहे.
वर्षभरातील दलाची कामगिरी
मनपा अग्निशमन दलात मिनी वाॅटर टेंडर वाहन दाखल झाले आहे. त्यामुळे गल्ली-बोळातील इमारतीला आग लागल्यास तिचे शमन करता येते. या शिवाय मोठे वाहनही दाखल झाले आहे.