आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोक कलाकारांसह ३५ पार्ट्यांचा सत्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या लोककला महोत्सवात अस्सल मराठमोळी लोककला, डफाची थाप, हलगी आणि ताशांचा कडकडाट, ढोलकीचा खणखणाट आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. उत्साह आणि आनंदाने जणू सभागृह ओसंडून वाहत होते. सोलापूरकरांनी बुधवारी सायंकाळी हलक्या पावसाच्या सरी झेलल्या तर फडकुले सभागृहात उपस्थितांनी विविध वाद्यांचा आवाज आणि कलांचा पाऊस.

डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात बुधवारी सायंकाळी पाच वाजता सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासनव्दारा, स्वप्नील सपना लोककला विकास मंडळ (मानेगाव)तर्फे लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

पालकमंत्री विजयकुमार देशमुख, उद्योगपती कुमार करजगी, राज्यनाट्य स्पर्धेतील अंतिम फेरीतील रौप्य पदक विजेते अभिनेता अरविंद माने यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी अध्यक्ष वामन बावळे, बब्रूवाहन गुंडपाटील, चंद्रकांत गडेकर, बाळासाहेब काळे, शाहीर विजय व्यवहारे, संजीवनी पाटील आदी लोककलावंत उपस्थित होते.

कलावंत मधुकर साळवे, नरसिंग भोगले, सरदार पिरजादे, चन्नबसवेश्वर सोलापुरे यांच्यासह ३१ कलावंत पार्ट्यांना गौरविण्यात आले. सत्कारास उत्तर देताना साळवे यांनी लोककलावंत लोककला जिवंत रहावी अशी आशा व्यक्त केली.

सूत्रसंचालन नागनाथ पाटोळे यांनी केले. चंद्रकांत गडेकर यांनी आभार मानले. सभागृहात उपस्थित ३५ पार्ट्यांनी या वेळी महाराष्ट्रातील विविध कलांचे सादरीकरण केले.

अंध कलावंताची हजेरी
सचिन आवताडे या माढ्याच्या कलावंतासोबत आलेल्या लक्ष्मण बारसकर या अंध कलावंताने तुणतुणे वाजवित खड्या आवाजात अंबे अंबाबाई हे शक्तिगीत सादर केले. सर्वच कलावंतांनी आपापली कला वाद्यवादन केले. परंतु यांची खूप वाहवा झाली.

स्वागतही लोककलेने
मान्यवरांचेसभागृहात आगमन होताना संबळ, ताशा, डफ, ढोल, पखवाज, तुतारी, झांज, मृदंग, ढोलकी, सनईने जंगी स्वागत करण्यात येत होते. विशेष म्हणजे हे स्वागत पारंपरिक फेटा, जॅकेट अंगरखा, विजार, नेहरु शर्टआदी पारंपारिक पोषाखात करण्यात आले.


कलावंत पोलिसांची रेलचेल
सभागृहातबंजारा समाजातील महिला, पोतराज, वासुदेव, शाहीर, भारुडकार, आराधी, जागरण गोंधळ करणारे वाघ्या मुरळी आदी बरेच कलावंत उपस्थित होते. त्यांनी अंगावरती तेच पोषाख घातल्याने पालकमंत्री देशमुख यांच्या संरक्षणार्थ २० ते २५ पोलिस कमांडोचा ताफा आल्याने सभागृहाला पोलिस छावणीचे रूप आले होते.
फोटोः भैरव मार्तंड सांस्कृतिक कला मंच (पंढरपूर)चे शाहीर विजयकुमार व्यव्हारे यांनी गर्जा महाराष्ट्र माझा सादर केले.