आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिकार प्रकरण: पाचही संशयितांना केले हजर; कामती पोलिसांची धडक कामगिरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- वटवटे (ता. मोहोळ) येथे दीड महिन्यांपूर्वी दोन काळविटांची शिकार केलेल्या पाचही आरोपींना बुधवारी कामती पोलिसांनी जबाब घेण्यासाठी वनविभागाकडे तत्काळ हजर केले. पंधरा दिवसांपूर्वी जबाब देण्यासाठी येण्याचे कबूल करून जामिनावर सुटलेले ते आरोपी गैरहजर राहिले होते.

‘काळवीट शिकार, तपास थंडावला’ या मथळ्याखाली गुरुवारी ‘दिव्य मराठी’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले. त्याची दखल घेऊन पोलिसांनी तत्काळ जामिनावर सुटलेल्या आरोपींना जबाब देण्यासाठी बोलावून घेतले.

कामती परिसरात रात्रीची गस्त घालणार्‍या पोलिसांच्या पथकाने संशयास्पद फिरणार्‍या एका जीपला अडवले. त्यावेळी गाडीमध्ये काळविटांचे दोन मृतदेह, अत्याधुनिक बंदूक, पिस्टन सापडले. घटनास्थळी तीन आरोपींना ताब्यात घेतले. पण, दोन आरोपी बंदुकीसह पळून गेले. त्यांना कोल्हापुरातून अटक करण्यात आली. पाचही आरोपींवर काळवीट शिकार प्रकरणी गुन्हा दाखल झाला. त्यापैकी एक आरोपी कोल्हापुरातील माजी आमदाराचा मुलगा आहे. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांपुढे त्या आरोपींचा जबाब दोषारोप पत्रामध्ये महत्त्वाचा असल्याने साहाय्यक उपवनसंरक्षक सुवर्णा झोळ या तीन ऑगस्टला कामती पोलिस स्टेशनमध्ये गेल्या होत्या. पण, त्यावेळी जबाब देण्यासाठी ते आरोपीच आले नव्हते. बुधवारी त्याबाबतची बातमी प्रसिद्ध होताच, पोलिसांनी तत्काळ त्यांना बोलावून घेतले. सायंकाळी साहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांनी त्या पाचही आरोपींना उपवनसंरक्षक कार्यालयात हजर केले. गुरुवारी सकाळी आरोपींचे जबाब घेण्यात येणार आहेत.

जबाब घेणार
जबाब नोंदविण्यासाठी त्या पाचही आरोपींना बुधवारी तत्काळ वनविभागाच्या अधिकार्‍यांपुढे हजर केले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली बंदूक व इतर साहित्य जप्त करण्यात आले. पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना तत्कळ अटक झाली होती. त्यांचा जबाब घेण्यात येणार असून लवकरच दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल.
- तुषार दोशी, अप्पर पोलिस अधीक्षक