आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरकरांना मिळणार जनआहार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांना स्वस्तात उत्तम आहार मिळणार आहे. फलाट क्रमांक दोन, तीन, चार व पाचवर अशा चार ठिकाणी रेल्वेचे जनआहार दालन सुरू होणार आहे.


एकूण पाच फलाट असलेल्या स्थानकावर खाद्यपदार्थांचे दालन नव्हते. तीन वर्षांपूर्वी चार व पाच क्रमांकाचे फलाट बांधण्यात आले. त्यासाठी दोन कोटींचा खर्च आला. गाड्या आणि प्रवाशांची वर्दळ वाढलेली आहे. त्यामुळे उत्तम आहार मिळणा-या ठिकाणाची सोय प्रवाशांच्या गरजेची होती. विशेषत: लांब पल्ल्यांच्या गाड्यातील प्रवाशांना याचा फटका बसत होता.


दालने असतील रेल्वेची
खाद्यपदार्थांची नवी चारही दालने रेल्वे प्रशासनाच्या मालकीची असणार आहेत. खाद्यपदार्थ स्वस्त तर असतीलच; पण ते चांगलेही असतील. दालने रेल्वेचीच असल्याने खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेची जबाबदारी रेल्वे प्रशासनाचीच असणार आहे.


अवैध विक्रेत्यांना चाप
फलाट चार व पाच क्रमांकावर रोज 15 ते 20 गाड्या येतात. खाद्यपदार्थ विकणा-या अवैध व्यावसायिकांचा वावर वाढला आहे. जादा दराने कमी प्रतीचे खाद्यपदार्थ प्रवाशांना विकत घ्यावे लागतात. अवैध विक्रेत्यांची दांडगाईही अलीकडे वाढली होती. या सर्व प्रकारांना चाप बसणार आहे.


तीन महिन्यांत दालन
दोन ते तीन महिन्यांत स्थानकावर जनआहाराचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. यामुळे प्रवाशांची प्रलंबित मागणी पूर्णत्वास जात आहे. रेल्वे प्रवाशांना चांगल्या दर्जाचे खाद्यपदार्थ उपलब्ध होणार आहेत.’’
सुशील गायकवाड, जनसंपर्क अधिकारी